नेपाळचे माजी पंतप्रधान लोकेंद्रबहादुर चंद्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल
नेपाळ :- नेपाळचे जेष्ठ राजकारणी असलेले माजी पंतप्रधान लोकेंद्र बहादूर चंद हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल ते हिंदुत्ववादी राजकारणी लेखक कवी म्हणूनही ओळखले जातात. लोकेंद्र बहादुर चंद यांनी वेळोवेळी अल्पकाळसाठी का होईना नेपाळचे पंतप्रधान भुषविले आहे. त्यांचा कार्यकाळ अल्प असा सहा महिने, एक वर्ष होता. कट्टर हिंदुत्वाचे समर्थन करणाऱ्या राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे ते संस्थापक नेते आहे.
ते राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे अध्यक्षही आहे, माजी पंतप्रधान लोकेंद्र बहादूर चंद यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे काठमांडू बीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माजी पंतप्रधान लोकेंद्र बहादूर चंद,राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे अध्यक्ष यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राजेंद्र प्रसाद लिंगडेन, खासदार दीपक सिंह, लोकेंद्र बहादूर चंद यांनी प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी बीर रुग्णालयात धाव घेतली आहे.नेपाळमधील सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते पक्षाचे नेते त्यांची प्रकृती लवकरच चांगली होण्यासाठी प्रार्थना करित आहे काठमांडू बिर रुग्णालयातील डॉ त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.
Comments
Post a Comment