मखमलाबाद विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी मोठ्या उत्साहात साजरी

मखमलाबाद विद्यालयात दिंडीसाठी प्रमुख पाहुणे म्हणुन मविप्र संचालक रमेश पिंगळे,माजी मुख्याध्यापक अरुण पिंगळे,वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे,प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य राजेंद्र गाडे,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते

मखमलाबाद  :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे आषाढी एकादशीनिमित्त भव्य दिव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.प्रमुख पाहुणे म्हणुन मविप्र संचालक रमेश पिंगळे, मराठा हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक अरुण पिंगळे,ग्रंथमित्र रामचंद्र अर्जुन काकड (सर) सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे हे उपस्थित होते.याप्रसंगी व्यासपिठावर प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य राजेंद्र गाडे,ज्युनियर काॅलेज प्रमुख उज्वला देशमुख,जेष्ठ शिक्षिका बेबी जाधव,सविता आहेर,भाग्यशाली जाधव आदी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवराय,सरस्वती,विठ्ठल रुक्मिणी व पालखीचे पुजन करण्यात आले.प्रास्ताविक प्राचार्य संजय डेर्ले यांनी केले.त्यांनी आषाढी एकादशी व दिंडी आयोजनाचे महत्व सांगितले.

प्राचार्यांच्या शुभहस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ,गुलाबपुष्प तसेच टोपी व उपरणे परिधान करुन स्वागत करण्यात आले.माजी मुख्याध्यापक अरुण पिंगळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,महाराष्ट्र ही संतांची भूमि आहेत.या पवित्र भूमीत आषाढी एकादशीला श्री क्षेत्र पंढरपुला विठोबारायाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी दिंड्या घेऊन जात असतात.ही फार मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहेत.आपली संस्कृती आपल्या सर्व विद्यार्थ्यांना माहित असावी यासाठी शालेय स्तरावर अशा कार्यक्रमांचे आवर्जुन आयोजन करण्यात येते.त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीनिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.संगीत शिक्षक तुकाराम तांबे व गीतमंचातर्फे विठुरायांची गीते व अभंग सुरेल आवाजात सादर करण्यात आले.त्यानंतर शालेय आवारात व गावातील स्टँडवर टाळ,मृदुंगाच्या तालात अतिशय छान असे गोल रिंगण पार पडले.या रिंगण सोहळ्यासाठी जेष्ठ शिक्षिका संगीता कुशारे व पुनम पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.यावेळस सर्व महिला शिक्षिका,विद्यार्थीनी यांनी फुगडीचा आनंद लुटला. विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी व पारंपारिक वारकर्‍यांचा पोषाख परिधान केलेला होता.या विद्यार्थ्यांना इयत्ता ७ वी तसेच सर्व वर्गशिक्षकांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.सुत्रसंचालन जेष्ठ शिक्षक अनिल पगार व वैशाली देवरे यांनी केले.कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. 


Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला