नवनीत फाउंडेशनची आंतरराष्ट्रीय योग दिनी शासकीय शिष्यवृत्ती कार्यशाळा
दिंडोरी :- दिनांक २१ जून २०२४ रोजी, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्याने, नवनीत फाउंडेशन व डांग सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ठक्कर बाप्पा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, अंबेगाव, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे "शासकीय शिष्यवृत्ती कार्यशाळा" आयोजित केली. कार्यशाळेची सुरुवात सकाळी सुर्य नारायणाच्या कोवळ्या किरणात आश्रम शाळेच्या मोकळ्या मैदानावर रंगनाथ भवर सरांच्या मार्गदर्शनाखाली योगासने आणि प्राणायामाने झाली, ज्यामुळे सहभागींना दिवसभराच्या कार्यक्रमासाठी उत्साह मिळाला.
कार्यशाळेत खुशवंतसिंग पाटील सर (गणित), रंगनाथ भावर सर (इंग्रजी व मराठी), आणि देवेंद्र पाटील सर (बुद्धिमत्ता) यांनी मार्गदर्शन केले. सचिन जोशी सर यांनी नवनीत फाउंडेशनच्या "नवदिशा पोर्टल" बद्दल माहिती देऊन सर्व सहभागींची आजीवन मोफत नोंदणी केली. डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती हेमलताताई बिडकर यांनी संपूर्ण वेळ कार्यशाळेला उपस्थिती लावली आणि कार्यशाळे बद्दल समाधान आणि नवनीत फाउंडेशनचे सचिन जोशी सर व तीनही तज्ञ मार्गदर्शकांचे मनापासून कौतुक केले.
या कार्यशाळेने शिक्षकांना शासकीय शिष्यवृत्तीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती देऊन त्यांच्या व्यावसायिक विकासाला चालना दिली. आंतरराष्ट्रीय योग दिनाशी संलग्न असल्याने, कार्यशाळेने शारीरिक व मानसिक आरोग्याच्या महत्त्वावरही भर दिला. नवनीत फाउंडेशनच्या या उपक्रमाने शिक्षणक्षेत्रात नवीन ऊर्जा निर्माण केली असून, भविष्यात अशा कार्यशाळा अधिक व्यापक स्तरावर आयोजित करण्याची आशा व्यक्त करण्यात आली.
Comments
Post a Comment