नाशिक :- रोटरी क्लब ॲाफ नाशिक रिव्हरसाईडचा पदग्रहण सोहळा डॅा.भरत केळकर आणि असिस्टंट गव्ह्रर्नर कविता डगावकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. क्लबच्या मावळत्या अध्यक्षा रत्ना कुलकर्णी यांच्याकडून नूतन अध्यक्षा नीता लेले, व स्नेहा कुलकर्णी, यांच्या समवेत सेक्रेटरी जयश्री बापट, यांनी पदभार स्वीकारून झाली. जिल्हयातील दुर्गम भागातील पाड्यांमध्ये जाऊन घनकचरा व्यवस्थापन,पिण्याचे शुध्द पाणी पुरवणे,आरोग्य सुविधा पुरविणेआदी उपक्रम राबविण्यात येतील असे विशेष काम करण्याचे आश्वासन नवनिर्वाचित अध्यक्षा अध्यक्षा नीता लेले, यांनी जाहीर केले.क्लबच्या मावळत्या पदाधिकाऱ्यांनी वर्षभरात केलेल्या कामाचे कौतुक करून त्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात मंजिरी फाळके, यांनी गणेश वंदनाने डॅा.भरत केळकर, यांनी त्यांच्या तीर या संस्थेतर्फे अनेक पाड्यांवर जाऊन ग्रामविकासाची कामे केली आहेत.त्यांनी जलबंधारे बांधून गावाच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे नीता लेले, यांनी सांगितले.
या कार्यक्रमास दादासाहेब देशमुख,नाना शेवाळे, एनक्लेव्ह प्रेसिडेंट अवतारसिंग पनफेर,जनसंपर्क प्रमुख आरती कुलकर्णी,मुग्धा लेले,शरयू देशमुख वेणूगोपाल आदींसह आजी,माजी पदाधिकारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन जयश्री पाटील, मंजुषा भावे यांनी केले. सेक्रेटरी जयश्री बापट यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment