सावरगाव येथे आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह रेशनकार्ड शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सावरगाव येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह रेशनकार्ड दुरुस्तीबाबत विशेष शिबिर संपन्न
येवला,दि.२९ जुलै :- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येवला तालुक्यातील सावरगाव येथे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना व रेशन कार्ड संदर्भात एकदिवसीय शिबिर पार पडले. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.
यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे,पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार, मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे,सरपंच कोमल पवार,तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी वंदना शिंपी, येवला नगरपालिकेचे उप मुख्याधिकारी रोहित पगार, नायब तहसीलदार विवेक चांदवडकर,अजित पवार,पांडुरंग शेळके, तलाठी ग्रामसेवक, अंगणवाडी शिक्षिका, सेविका यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी तालुक्यामध्ये विविध ठिकाणी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. तसेच या योजनेसाठी आवश्यक रेशन कार्ड दुरुस्तीचे कामेही करण्यात येत आहे. या माध्यमातून नवीन रेशन कार्ड, रेशन कार्ड मध्ये नावे टाकने, काढणे, जुने जीर्ण झालेल्या शिधापत्रिका बदलणे ही विविध कामे करण्यात येत आहे. या शिबिरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे २२०० अर्ज स्वीकारण्यात आले. तर १५० रेशनकार्ड मधील तात्काळ दुरुस्ती करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा