आ सिमाताई हिरे यांच्या उपस्थितीत उत्तमनगरच्या अभिनव बालविकास मंदिरमध्ये पालक शिक्षक संघाची निवड
सिडको : मविप्र समाज संचलित उत्तमनगर येथील अभिनव बालविकास मंदिर शाळेत नवनिर्वाचित पालक शिक्षक संघासमवेत आमदार सीमा हिरे, ॲड. लक्ष्मण लांडगे, मुख्याध्यापिका ज्योती पवार, ज्येष्ठ शिक्षिका नीलिमा बच्छाव आदींसह शिक्षकवृंद
सिडको :- मविप्र समाज संचलित उत्तमनगर येथील अभिनव बालविकास मंदिर शाळेत पालक शिक्षक संघाची निवड करण्यात आली. प्रमुख पाहुणे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तथा आमदार सीमा हिरे, मविप्रचे शहर संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, मुख्याध्यापिका ज्योती पवार, ज्येष्ठ शिक्षिका नीलिमा बच्छाव, आदी उपस्थित होते. सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन झाले. मुख्याध्यापिका ज्योती पवार यांनी प्रास्ताविकातून सभेचे महत्त्व व हेतू विशद केला. त्यानंतर प्रत्येक वर्गातून निवड झालेल्या नवनिर्वाचित पिता पालकांचा सत्कार करण्यात आला. त्यात मुकुंद तांबे, आशा गिरणार, पवन शेवाळे, संदीप पाटील, राजू चौधरी, अनिल वाघ, नवनाथ डांगे, सचिन वाघ, उज्वला जाधव, सोमनाथ सायकर, चांगदेव आव्हाड, संदीप गव्हाणे, सीमा कराळे, उषा धिंदळे, अपर्णा पवार, जयश्री भेंडाळे, उषा अहिरे, शीतल बेंडाळे, व विद्यार्थी प्रतिनिधी तन्मय काकुळते, आदी उपस्थित होते. यानंतर सोडत पद्धतीने पिता पालकांतून उपाध्यक्षपदी संदीप गव्हाणे, व सहसचिवपदी संदीप पाटील, यांची निवड करण्यात आली. तसेच आमदार सिमाताई हिरे, व ॲड. लांडगे, यांनी मनोगतातून शिक्षक व पालक यांची भूमिका विद्यार्थी घडवण्यात कशी महत्त्वाची असते, यावर मार्गदर्शन केले. अर्चना आहेर, यांनी सूत्रसंचालन केले. निवड प्रक्रियेप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment