मखमलाबाद विद्यालयात कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा
मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभहस्ते क्रांतिवीरांच्या प्रतिमांचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी व्यासपिठावर उपप्राचार्य राजेंद्र गाडे,इ.८ वी चे वर्गशिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.कु.जिया गुंजाळ व कु.तेजश्री पवार यांनी कारगिल विजय दिनावर आधारीत आपले मनोगत व्यक्त केले.कारगिल युध्दातील २६ जुलै १९९९ चा तो दिवस भारतीय लष्कराच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदविला गेला आहे.दरवर्षी या दिवशी कारगिल युध्दात शहिद झालेल्या शेकडो भारतीय जवानांना श्रध्दांजली अर्पण केली जाते.भारतीय सशस्र दलाच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी देशभरात विविध ठिकाणी हा दिवस साजरा होत असतो.कु.प्रांजल सोज्वळ व कु.भाविका पाटील यांनी देशभक्तिपर गीतावर अतिशय छान असे नृत्य सादर केले.तसेच संगीत शिक्षक तुकाराम तांबे व गीतमंचातर्फे अतिशय सुरेल असे देशभक्तिपर गीत सादर केले.सुत्रसंचालन कु.स्वराली परदेशी व आभार प्रदर्शन कु.आदीती जगताप यांनी केले.या सर्व विद्यार्थ्यांना वर्गशिक्षका चैताली मोगल व योगिता कासार यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment