प्रदिर्घ सेवेनंतर शिक्षकेत्तर कर्मचारी श्री कैलासराव त्रंबक कुवर निवृत्त संस्थेच्या वतीने सन्मान

🌹सेवापूर्ती 🌹

मैत्रीच्या दुनियेतील दिलदार राजा माणूस! अर्थ
असे व्यक्तिमत्व म्हणजेच डांग सेवा मंडळ संचलित आश्रम शाळा आंबेगण येथील शिक्षकेतर कर्मचारी श्री कैलासराव त्रंबक कुवर (सर) 30/06/2024 रोजी सेवानिवृत्त झाले श्री के. टी कूवर सर यांनी व्यक्तिमत्व, कर्तुत्व, मित्र परिवारांच्या जोरावर स्वतःचे संघटन कौशल्य त्यांनी विकसित केले! पुढे नोकरीच्या निमित्ताने सुरुवातीला डांग सेवा मंडळ नाशिक यांच्या संस्थेत सेवेला सुरुवात केली, बिडकर दादा, विजय दादा, हेमलता ताई, मृणाल ताई, या सर्वांच्या विश्वासाला पात्र असलेलं व्यक्तिमत्व. पण मनात प्रबळ इच्छाशक्ती आणि महत्त्वकांक्षा असल्याने मैत्री, राजकारण व शिक्षक त्रिकोणात त्यांनी कधी गल्लत केली नाही!या तिन्ही मध्ये योग्य अंतर ठेवले!तरी मैत्रीचा त्यांना त्रास झाला पण त्याचा त्यांनी कधी विचार केला नाही.कदाचीत त्यांची विचार करण्याची शक्ती तेवढी असेल म्हणून त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले! डॉ . सूर्यवंशी अशोक जी. आरोग्य विस्ताराधिकारी पंचायत समिती सिन्नर यांच्या परिवाराच्या वतीने उर्वरित आयुष्यासाठी, सुखी समाधानासाठी, निरामय आयुर आरोग्यासाठी, सेवानिवृत्ती निमित शुभेच्छा.💐💐💐🌹🌹🌹🌹

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला