डे केअर शाळेत 31वा वर्धापन दिन उत्साहात साजरा


प्रतिनिधी इंदिरानगर - येथील ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ संचलित डे केअर सेंटर शाळेतील आनंदवन बालमंदिरात शाळेचा 31वा वर्धापन दिना निमित्त विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी आशा पाटील, तसेच संस्थेचे सचिव गोपाळ पाटील, आनंदवन बालमंदिराच्या पूनम सोनवणे, आदी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते सरस्वती पूजन व वृक्ष पूजन तसेच 31 दिवे लावून औक्षण करण्यात आले.
मोठ्या गटातील मिहीका कोळी,  या विद्यार्थिनीने कान्हा सोजा जरा या गाण्यावर नृत्य केले. मोठ्या गटातील विद्यार्थ्यांना चौब्बी चिक्स ही कविता सादर केली. माकडे निघाली शिकारीला हे अभिनय गीत सर्व विद्यार्थ्यांनी सादर केले. लहान गटातील विद्यार्थ्यांनी वन टू बकल माय शूज ही कविता सादर केली. मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनीआई मला शाळेत जायचं नूत्य सादर केल.चिमुकल्यांच्या हस्ते केक कापून करून 31वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेचे सचिव गोपाळ पाटील यांनी आपल्या मनोगतातून पालकांना आवाहन केले की विद्यार्थ्यांच्या विकासात शिक्षकां बरोबरच पालकांचाही सहभाग महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. त्यामुळे पालकांचाही सहभाग असावा. अधीक्षिका डॉ.मुग्धा सापटणेकर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या आपली शाळा खूप नावाजली आणि फुलली हे बघताना खूप आनंद होतो त्यामागे तुम्हा सर्व पालक आणि विद्यार्थी यांचे समर्पित भाव आणि नवजीवनची ऊर्जा आहे त्याशिवाय सर्व संस्था चालकही अभिनंदनीय आहे.संस्थेचे संचालक मंडळातील सर्व सदस्यांनी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्यताई व सर्व ताई तसेच विद्यार्थी व पालकांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल धनवटे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन