सिद्धेश्वर प्राथमिक आश्रम शाळात वह्या पुस्तके मिष्ठान्न वाटप
कळवण :- राहूल पाटील, अध्यक्ष साई मोरया मित्र मंडळ पाटील नगर सिडको नाशिक,रमेश मोरणकर, विशाल माले, यांचे तर्फे दि.०७/०७/२४वार रविवार रोजी सिद्धेश्वर प्राथमिक आश्रम शाळा सुळे कळवण येथे 9 वी आणि 10 वी विद्यार्थ्यांसाठी मराठी माध्यमाचे पाठ्यपुस्तकांची संच, शैक्षणिक साहित्य व विद्यार्थ्यांसाठी मिष्टान्न देण्यात आले. सदर कार्यास कृष्णा प्लायवूडचे संचालक अमोल मोरे ,एलआयसी डिव्हिजन ऑफिसचे वीरेंद्रसिंग परदेशी, राजेश झेंडे, रवींद्र वारे, चित्राव सर, पाटेकर सर, मर्चंट नेव्ही मधील गणेश आरोटे, योगेश पवार,(बिल्डर) विशाल परदेशी, (पोलीस)मिलिंद अहिरे, व जोत्स्ना पटेल यांच्या अनमोल सहकार्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्मितहस्य फुलले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक जाधव सर प्राचार्य यांनी केले.डोंगरे सर, भोये मॅडम, कोळेकर सर यांनी आभार व्यक्त केले.
Comments
Post a Comment