मखमलाबाद विद्यालयात कर्मवीर मालोजीराव मोगल यांना विनम्र अभिवादन
फोटो - माजी सरचिटणीस कर्मवीर काकासाहेब मोगल यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापुजन करतांना प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य राजेंद्र गाडे,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

मखमलाबाद:- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे सहकारमहर्षी,लोकनेते,मराठा विद्या प्रसारक समाजाचे माजी सरचिटणीस कर्मवीर मालोजीराव तथा काकासाहेब मोगल यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य राजेंद्र गाडे यांच्या शुभहस्ते प्रतिमापुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी व्यासपिठावर जेष्ठ शिक्षकवृंद उपस्थित होते.प्रास्ताविक उपप्राचार्य राजेंद्र गाडे यांनी केले.त्यांनी काकासाहेबांचे नाशिक जिल्ह्यातील राजकिय, सहकार,शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सविस्तर माहिती दिली.निफाडचे आमदार,निसाका मधील त्यांचे योगदान खुपच कौतुकास्पद होते.त्यांच्या या कार्याबरोबरच त्यांचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतील कार्यसुध्दा अतिशय मोठे होते.मविप्र संस्थेत सरचिटणीस असतांना त्यांनी संस्थेचा विकास करुन संस्था प्रगततीपथावर नेली.कु.तृप्ती म्हैसधुणे हिने काकासाहेबांच्या जीवनकार्याविषयी सखोल माहिती दिली.या विद्यार्थ्यांना जेष्ठ शिक्षक अभिजीत न्याहारकर व पल्लवी पगार यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment