जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कार्यशाळेचे आयोजन
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त शासनाच्या विविध प्रशिक्षण योजना संदर्भात जनजागरणासाठी दिनांक 15 रोजी कार्यशाळेचे आयोजन
नाशिक :- जागतिक कौशल्य दिनानिमित्त शासनाच्या विविध प्रशिक्षण योजना संदर्भात जनजागरणासाठी दिनांक 15 रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती युवाशक्ती फाउंडेशन तर्फे देण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे आयोजन अंबड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन च्या सभागृहात दिनांक 15 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत करण्यात आले आहे. या कार्यक्रमास कौशल्य विकास उपायुक्त सुनील सैंदाणे, महाराष्ट्र शासन तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव मोहम्मद शाहिद उस्मानी, बोर्ड ऑफ अप्रेंटीशीप ट्रेनिंग चे पश्चिम विभागाचे सहसंचालक डॉ. प्रवीण उके, एन एस डी सी चे पश्चिम विभागाचे मुख्य अधिकारी मोहम्मद कलाम, नाशिक विभागाचे अप्रेंटीशीप ॲडव्हायझर जे जे पाटील, हे नाशिक अंबड सातपूर सिन्नर इगतपुरी दिंडोरी तसेच नाशिक जिल्ह्यातील कंपन्यातील मनुष्यबळ विकास व्यवस्थापक व अधिकारी यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी मुख्यत्वे पुढील विषयांवर मार्गदर्शन होणार आहे एम एस बी टी ची कमवा व शिका योजना , नुकतीच लागू झालेले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. महाराष्ट्र अप्रेंटीशीप प्रमोशन स्कीम व NAPS 2.0 व NATS 2.0 मधील झालेले बदल.
सदर कार्यक्रमासाठी अंबड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन चे अध्यक्ष ललित बुब, नाशिक निपम चॅप्टर चे अध्यक्ष प्रकाश बारी व सचिव हेमंत राख ,अंबड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन चे एच आर समितीचे अध्यक्ष धीरज वडनेरे, सिन्नर तालुका को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रियल इस्टेटचे अध्यक्ष नामकर्ण आवारे त्यांचे विशेष सहकार्य लाभत असल्याची माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली आहे.
तसेच या शासनातर्फे राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची विस्तृत माहिती घेऊन त्याची यशस्वी अमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.आयोजित कार्यक्रमास आयमा हाऊस सभागृहात मनुष्यबळ विकास व्यवस्थापक व व्यवस्थापकीय अधिकारी यांनी मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment