संतोष जगताप यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार वाहतूक विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड
नाशिक :- सामाजिक कार्यकर्ते संतोष जगताप यांची वाहतूक विभाग नाशिक शहर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, वाहतूक प्रदेशाध्यक्ष माजी आमदार मिलिंद कांबळे, यांच्या उपस्थितीत मुंबई पार्टी कार्यालयामध्ये करण्यात आली. जगताप यांच्या निवडीबद्दल खासदार भास्कर भगरे, शहराध्यक्ष गजानन शेलार, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार नितीन भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष दत्तू पाटील,जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड माजी शहराध्यक्ष नाना महाले प्रदेश कार्याध्यक्ष युवक पुरुषोत्तम कडलग,जिल्हा युवक अध्यक्ष शाम हिरे, महिला शहराध्यक्ष अनिता दामले, माजी संचालक सचिन पिंगळे, छबू नागरे, बाळा निगळ, आदी मान्यवरांनी भावी वाटचालीसाठी पक्षवाढीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment