मखमलाबाद विद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन मोठ्या उत्साहात साजरा
मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे जागतिक लोकसंख्या दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कु.संजना थोरात हिने लोकसंख्या दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
जगभरात दरवर्षी ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणुन साजरा केला जातो.या निमित्ताने लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणार्या समस्यांकडे लक्ष वेधले जाते.११ जुलै १९८७ रोजी जगातील पाच अब्जावे बालक युगोस्लाव्हीया येथे जन्माला आले.यामुळे वाढणार्या लोकसंख्याविषयी जनमानसात जागृती निर्माण झाली व अखेर युनोने पण याची दखल घेऊन १९८९ सालापासुन हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणुन घोषित केला.या निमित्ताने विविध कार्यक्रम जगभर साजरे केले जातात.लोकसंख्यावाढीमुळे जाणवणार्या समस्यांकडे लोकांचे लक्ष वेधणे,त्याविषयी जनजागृती करणे आणि या समस्येशी लढा देणे तसेच जागतिक लोकसंख्या दिनाचा उद्देश,कुटुंब नियोजनाचे महत्व,लिंग समानता,गरिबी,आरोग्य आणि मानवी हक्क यांसारख्या विविध लोकसंख्येच्या मुद्द्यावर लोकांमध्ये जागरुकता वाढवणे हा आहे.इयत्ता ८ वी ई च्या या विद्यार्थिनीस वर्गशिक्षिका पल्लवी पगार यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमास प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य राजेंद्र गाडे,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होत.
Comments
Post a Comment