मखमलाबाद विद्यालयात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्रक्रिया शिबीर संपन्न

मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्रक्रिया शिबीर प्रसंगी मविप्र संचालक रमेश पिंगळे,सेवक संचालक चंद्रजित शिंदे,प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य राजेंद्र गाडे,डाॅ.रवि सोनवणे व उपस्थित सर्व मान्यवर
मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे मविप्र समाजाचे डाॅ.वसंतराव पवार वैद्यकिय महाविद्यालय,रुग्णालय व सशोधन केंद्र यांच्या वतीने "रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा" या उदात्त भावनेने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्रक्रिया शिबीर तसेच कान,नाक,घसा मोफत तपासणी शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन मविप्र संचालक रमेश पिंगळे,सेवक संचालक चंद्रजित शिंदे उपस्थित होते.

याप्रसंगी व्यासपिठावर स्कुल कमिटी सदस्य दिलीपराव पिंगळे,नारायण वाघ,नरेंद्र मुळाणे,साहेबराव पिंगळे,बाळासाहेब पिंगळे,भास्कर तांबे,राजेंद्र ढबले,सुनिल बुनगे आदी मान्यवर उपस्थित होते.त्यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवरायांचे व सरस्वतीचे पुजन करण्यात आले.प्रास्ताविक प्राचार्य संजय डेर्ले यांनी केले.मविप्र रुग्णालयातर्फे हजारो दृष्ट्या दुर्बल घटकांना उच्च दर्जाचीआरोग्य सेवा निरंतर दिली जाते.हि सेवा अधिकाधिक लाभार्थीपर्यंत पोहोचावी या हेतुने आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून,मोतीबिंदु मुक्त अभियान राबविण्याचा संकल्प मविप्र समाजाच्या कार्यकारिणीने केला आहे.हा संकल्प डाॅ.वसंतराव पवार वैद्यकिय महाविद्यालयाच्या माध्यमातुन पूर्णत्वास जावा यासाठी विविध ठिकाणी नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.सदर शिबिरात आढळलेल्या शस्रक्रिया योग्य रुग्णांवर बिनटाक्याची शस्रक्रिया,भिंगारोपण (लेन्स) पध्दतीने मविप्र रुग्णालय आडगाव येथे करण्यात येईल.तसेच तिरळेपणा,लासुर,पडदा,नेत्रपटल रोपण या शस्रक्रिया अल्पदरात केल्या जातील.प्राचार्य संजय डेर्ले यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.मविप्र सेवक संचालक चंद्रजित शिंदे यांनी शिबीराचा उद्येश सांगुन सर्वांना शुभेच्छा दिल्या.शिबीर यशस्वितेसाठी मेडिकल काॅलेजचे समन्वयक डाॅ.रवि सोनवणे,डाॅ.सृष्टी घुगे,डाॅ.कोमल आव्हाड,डाॅ.पुजा गांगुर्डे यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला