Posts

वाकी येथील साई भंडारा,भक्ती गीतांच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे, आयोजकांचे आवाहन

Image
घोटी: वाकी येथे साई श्रद्धा ग्रुपच्या वतीने रामनवमी निमित्ताने भव्य साई भंडाराच्या आयोजन गुरुवार दिनांक ३०/०३/२०२३ रोजी करण्यात आले असून सकाळी १० ते १२ ह्या वेळेत सत्यनारायण पूजा तसेच दुपारी एक ते सहा वाजेपर्यंत महाप्रसादाचा भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे रात्री ९ ते 11 दरम्यान साई भक्ती गीतांचा कार्यक्रम होणार असून सदरचा साई भंडारा कार्यक्रमाचे हे तेरावे वर्ष आहे. साई श्रद्धा ग्रुप वाकी यांच्यावतीने साई भंडारा तसेच साई भक्ती गीतांच्या कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सातपुरला सरदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव भव्यदिव्य कार्यक्रमांनी उत्साहात साजरा

Image
सातपूर : (प्रतिनिधी रामचंद्र ताठे) हिंदुस्थानचे युगपुरूष, होळकरशाहीचे संस्थापक श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचा जन्मोत्सव निमित्त  प्राध्यापक यशपाल भिंगे सर यांचा नागरी सत्कार मोठ्या उत्साहात संपन्न.  राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती आयोजित केलेल्या सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव मोठ्या उत्साहात नाशिकच्या तुळजाभवानी मैदानावर येळकोट येळकोट जय मल्हारचा निनाद घुमला. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक यशपाल भिंगे सर, शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, ओबीसी तथा जेष्ठ धनगर समाज नेते मा. आ. प्रकाश आण्णा शेंडगे यांच्यासह प्रहारचे जिल्हा चिटणीस श्री. समाधान भाऊ बागल, खंडेराव पाटील, शिवाजी दादा ढेपले, दत्तू भाऊ बोडके, विनायक काळदाते, शरद भाऊ शिंदे, भास्कार जाधव, देविदास भडांगे, संदिप तांबे, नंदाळे सर, भिवानंद काळे, बापूसाहेब शिंदे, अरुण शिरोळे, शिवाजी ढगे, राजाभाऊ पोथारे, भाऊलाल तांबडे, लक्ष्मण बर्गे तसेच हजारो होळकर प्रेमी उपस्थित होते. इतिहासाची आठवण देणारा हा सोहळा लक्षवेधी ठरला. अध्यक्षा सौ. सोनालीताई पोटे, उ...

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा,प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्राणांतिक उपोषण

Image
चांदवड : (प्रतिनिधी अरुण शिरोळे) नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे प्रहार जनशक्ती पक्षच्या वतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केली असून कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत अडचणीत आला आहे. कांद्याला दोनशे,तीनशे रुपये क्विंटल असा मातीमोल भाव मिळत असल्याने सरकारने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात,उत्पादन खर्च पंधराशेच्या वर जवळपास सत्तर टक्के वजा खर्चात कांदा विकला जात आहे.सरकारने शेतकरी बांधवांना किमान ५०० रुपये अनुदान द्यावे, किमान १२०० रुपये भाव, मिळावा,बाजारसमितील अवांतर नियमबाह्य खर्चावर आळा घालावा, समित्यांच्या बाजार भावात तीनशे,पाचशे फरक करू नये याकरिता उपजिल्हानिबंधका मार्फत समिती नेमून काम बघावे, कांदा वादा हे प्रकरण कायमचे मिटवून तसा कायदा करण्यात यावा.कांदा निलावा नंतर १ रुपये किमी पेक्षा जास्त वाहतूक खर्च आकारला जाऊ नये अशा प्रकारच्या मागण्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या राज्य वतीने करण्यात आल्या आहेत.यावेळी प्रहारचे गणेश निंबाळकर,प्रकाश चव्हाण,सह कार्यकर्ते,शेतकरी प्राणांतिक उपोषणाला उपस्थित होते.

छगन भुजबळ यांच्या हस्ते एलाईट प्लास्टिक कॉस्मेटीक सर्जरी सेंटरचे उद्घाटन

Image
नाशिक : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते  नाशिक शहरातील गंगापूर रोड येथील एलाईट प्लास्टिक कॉस्मेटीक सर्जरी सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ.भारतीताई पवार, आमदार सीमाताई हिरे, माजी खासदार समीर भुजबळ, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, हॉस्पिटलचे संचालक डॉ.विलास बच्छाव व परिवारातील सदस्य  उपस्थित होते.

ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे येथील ध्रुव नगर मध्ये महाशिवरात्री निमित्त भव्य बारा ज्योतिर्लिंग अध्यात्मिक मेळाव्याचे आयोजन

Image
गंगापूर रोड -(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)  महाशिवरात्री या शब्दात रात्री या शब्दाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे भगवंत निराकार शिव परमार्थ्याचे या सृष्टीवर अज्ञान अंधकार व कलियुगी रुपी रात्री अवतरण होते याचेच प्रतिक म्हणजे महाशिवरात्रि होय निराकार शिव परमात्मा हे याच पापाचारी अज्ञानमय अंधकार रुपी कलियुगाचा विनाश करण्यासाठी या सृष्टी वर अवतरित होतात, याच स्मृती प्रित्यर्थ महाशिवरात्री साजरा केली जाते आजच्या महाशिवरात्रीनिमित्त सर्व भक्तांना आग्रहाचे निमंत्रण आहे की निराकार शिव परमात्म्याचा  सत्य परिचय प्राप्त करून खरी महाशिवरात्री साजरी करा असे असे प्रतिपादन राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी जी यांनी केले, ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे येथील ध्रुव नगर मध्ये महाशिवरात्री निमित्त भव्य बारा ज्योतिर्लिंग अध्यात्मिक मेळाव्याचे  आयोजन दिनांक 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलेले आहे या अध्यात्मिक मेळ्याच्या उद्घाटन प्रसंगी दीदीची अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे सकल भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी आध्यात्मिक जीवन उन्नत बनवण्यासाठी जीवनात सु...

वारली चित्रकार मनिषा बोरसे यांची विश्वविक्रमी शिव चरित्र रेखाटने

Image
इंदिरानगर  :- येथील सुखदेव प्राथमिक मराठी विदयामंदिर शाळेतील उपशिक्षिका मनिषा बोरसे-पाटील यांनी दी. १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधुन १९ लघु वारली चित्र काढून विश्वविक्रमात नोंद केली.असुन मनिषा बोरसे-पाटील यांना या विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र व मेडल माजी खासदार तसेच स्वराज्य संघटना प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. या वारली चित्रात शिवरायांचे बालपण ते राज्याभिषेका पर्यंतचे महत्वाचे १९ प्रसंग वारली चित्रशैलीत प्रत्येकी ४ बाय ४ सेंटीमीटर इतक्या लहान कागदावर त्यांनी रेखाटन केले आहे. यात आरमार स्थापना व राज्याभिषेक सोहळा इत्यादी घटनांची चित्रे समाविष्ट आहेत.वल्द वाईड बुक ॲाफ रेकॅार्ड मध्ये लघु वारली चित्र या मथळ्याखाली सदर विक्रमाची नोंद झाली आहे. या वेळी आमदार माणिकराव कोकाटे, जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा शितल सांगळे, स्वराज्य संघटना प्रवक्ता करण गायकर आदी. मान्यवर उपस्थित होते. दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनी सदर विश्वविक्रमाची सविस्तर माहिती जाणुन घेऊन मनिषा बोरसे यांचे कौतुक केल...

आदिवासी विकास परिषदेचे लकी जाधव यांना धमकीचा फोन

Image
नाशिक : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष लकी जाधव यांना धमकी मिळाली व बोगसांपासून त्यांच्या जीविताला धोका असल्याने त्यांच्या विरोधात (अनोळखी व्यक्ति बोगस आदिवासी समाधान कोळी रा उस्मानाबाद यांनी रात्रीच्या सुमारास धमकी दिल्याने याच्यावर अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा यामागणीसाठी नाशिक येथे मुंबईनाका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अहिरे  यांना निवेदन देण्यात आले.यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष लकी जाधव यांच्यासह अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवा कार्याध्यक्ष गणेशभाऊ गवळी, के ए ग्रुप अध्यक्ष संदीपभाऊ गवारी उपस्थित होते

वर्षातील पहिल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ११.९५ लाख दखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे निकाली

Image
वाहतूक विभागाला ५१ कोटींहून अधिक महसूल मुंबई  : राज्यभरात दिनांक ११ फेब्रुवारी, २०२३ रोजी न्यायालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या वर्षातील पहिल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ११.९५ लाख दखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. या माध्यमातून ७.८० लाख वाहतूक विभागाच्या ई- ट्रॅफीक चलन प्रकरणांमध्ये सुमारे ५१.२० कोटीं रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार व प्रभारी मुख्य न्यायमुर्ती संजय गंगापूरवाला, प्रमुख आश्रयदाते, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व न्यायमूर्ती रमेश धानुका, कार्यकारी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील ३४ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे, ३ उच्च न्यायालय विधी सेवा समिती, उपसमित्या आणि ३०५ तालुका विधी सेवा समित्या येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. लोक अदालतीच्या ५ दिवस आधी घेण्यात आलेल्या विशेष अभियानामध्ये ५५ हजार ६८७ प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. राष्ट्रीय लोक अदालतीच्या यशस्वीततेसाठी न्यायमूर्ती बी. रमेश धानूका...

राज्याच्या विकासात प्रसारमाध्यमांचे मोठे योगदान - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Image
मुंबई : प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. राज्याच्या विकासात माध्यमांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. दैनिक लोकसत्ताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नरीमन पॅाईंट येथील एक्सप्रेस टॅावर इमारतीत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री  शिंदे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, अतिरिक्त मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, लोकसत्ता समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद गोयंका, संपादक गिरीश कुबेर आदी मान्यवर उपस्थित होते. काळ, समाजकारण, राजकारण बदलले तरीसुद्धा गेल्या ७५ वर्षांपासून लोकसत्ताने आपली प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता कायम ठेवल्याबद्दल कौतुक व्यक्त करुन मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यात चांगले काम करणाऱ्या विविध संस्थांना पुढे आणण्याचे काम आणि महिला, युवकांसाठी लोकसत्ता समूहामार्फत विव...

श्री संत बाळूमामांच्या मेंढ्या उडवून पळालेल्यास कठोर शासन, तसेच नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी, मेंढपाळ कृती समितीच्या वतीने करण्यात आली

Image
सिन्नर : श्री संत श्री बाळु मामा यांच्या मेंढ्या चा अपघात होऊन अज्ञात वाहानाच्या धडकेने १५ मेंढ्या उडवल्याने भक्तांमध्ये संतप्त भावना निर्माण झाली आहे.सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे संत श्री बाळु मामा यांची पालखी गावाजवळ पोहचली, शहा पंचाळे चौफुली ह्या ठिकाणी हा अपघात झाला यात पंधरा मेंढ्या उडवुन अज्ञात गाडीचालक पसार झाला.  यावेळी संतप्त झालेल्या भक्त परिवाराने गावकऱ्यांनी घटनास्थळी त्याचप्रसंगी रात्रीच्या वेळी रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते.यावेळी उपस्थित पोलिस प्रशासन,राजकिय नेते यांनी आंदोलकांची समजूत काढली कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते, अजूनही योग्य ती कारवाई झाली नसल्याने मेंढपाळ कृती समितीचे अध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र धनगर समाजाचे नेते अरुण दादा शिरोळे, दिपक सुडके, शहा ग्रा प सदस्य शरद मोरे, बाळासाहेब साबळे, ज्ञानेश्वर मोरे, यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच त्याअज्ञात वाहनधारकांचा शोध घेऊन कडक कारवाई करावी गुन्हा दाखल करून सीसीटिव्ही चेक करुन संबंधितांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी राज्य सरकारकडे, करण्यात आली आहे.

माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी यांचे महावितरणला निवेदन

Image
वीज दरवाढीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा तीव्र विरोध  नाशिक :- राज्यात वीज वितरण कंपनीकडून वीज दरवाढ करण्यात येत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि उद्योजक देखील अडचणीत येणार असून राज्यात होणारी वीजदरवाढ ही अन्याय कारक आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत वीज दरवाढ करण्यात येऊ नये अशी मागणी नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी पदाधिकारी यांनी महावितरणकडे केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे वतीने आज वीजदरवाढीला तीव्र विरोध करत नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, निवृत्ती अरिंगळे, संजय खैरनार, मनिष रावल, बाळासाहेब मते, सुनिल महाले, मनोहर कोरडे, कविता कर्डक, समाधान जेजुरकर, प्रशांत वाघ, जगदीश पवार, नियमात शेख, मिलिंद पगारे, गौतम पगारे, प्रकाश थामेत, योगेश निसाळ, सोनू वायकर, राजाभाऊ जाधव, चेतन कासव, रोहित पाटील, रुपाली पठाडे, कुंदा सहाणे, योगिता पाटील, रुपाली तायडे...

श्री संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन

Image
सिडको : गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त विजयनगर, सिडको येथे गजानन महाराज पालखी मिरवणूक काढण्यात आली पालखी मधे महिलांनी हिरव्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या भक्तीमय वातावरणात नाचत वाजत गाजत पालखी मिरवणुक काढुन श्रींची प्रतिमा पुजन करुन महाआरती करण्यात आली, महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी महाप्रसाद खास करुन महिलांनी स्वत: भाकरी करुन, पिठलं भाकर, लापसी, ठेचा व मसालेभात असे नियोजन करण्यात आले होते.  प्रसंगी श्री संत गजानन महाराज सेवा मंडळ व महिला मंडळ विजयनगर तसेच भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ. कमलेश डडवाल, कुसुम शेवाळे, वर्षा वेताळ, सुरेखा जाधव, कुसुम जाधव, गंगा शेवाळे, रुपाली चौधरी, शिवानी डडवाल, पुजा कनकुसे, रोजी मिश्रा,सविता शहा, राणी पाटील, नाना शेवाळे, गुरुबच्चनसिंग डडवाल, अर्जुन वेताळ,अनिल डडवाल, कृष्णा शेवाळे, संतोष जाधव, आशुतोष मिश्रा,महेश जाधव, संदिप दोंदे, कैलास मोरे, देवचंद केदारे, सोनु शहा, आदिंनी परिश्रम घेतले.