श्री संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन
सिडको : गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त विजयनगर, सिडको येथे गजानन महाराज पालखी मिरवणूक काढण्यात आली पालखी मधे महिलांनी हिरव्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या भक्तीमय वातावरणात नाचत वाजत गाजत पालखी मिरवणुक काढुन श्रींची प्रतिमा पुजन करुन महाआरती करण्यात आली, महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी महाप्रसाद खास करुन महिलांनी स्वत: भाकरी करुन, पिठलं भाकर, लापसी, ठेचा व मसालेभात असे नियोजन करण्यात आले होते. प्रसंगी श्री संत गजानन महाराज सेवा मंडळ व महिला मंडळ विजयनगर तसेच भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ. कमलेश डडवाल, कुसुम शेवाळे, वर्षा वेताळ, सुरेखा जाधव, कुसुम जाधव, गंगा शेवाळे, रुपाली चौधरी, शिवानी डडवाल, पुजा कनकुसे, रोजी मिश्रा,सविता शहा, राणी पाटील, नाना शेवाळे, गुरुबच्चनसिंग डडवाल, अर्जुन वेताळ,अनिल डडवाल, कृष्णा शेवाळे, संतोष जाधव, आशुतोष मिश्रा,महेश जाधव, संदिप दोंदे, कैलास मोरे, देवचंद केदारे, सोनु शहा, आदिंनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment