स्वरानंद म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत सुमधुर हिंदी गाण्यांचा कार्यक्रम - सहभागी होण्याचे आवाहन
नाशिक : स्वरानंद म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत सुमधुर हिंदी गाण्यांचा कार्यक्रम सुनहरी शाम रविवार दि. १२ फेब्रुवारी सायं ६ वा. परशुराम सायखेडकर नाट्यगृह, शालीमार येथे आयोजित केलेला आहे.
सदर कार्यक्रमात गायक संजय अडावदकर , राजेश बागुल, सौ. वैशाली बोकील, ज्ञानेश्वर चौधरी हे गाजलेली गाणी सादर करणार आहेत. प्रवीण पोतदार हे निवेदन करणार आहे.
संकल्पना वैशाली बोकील यांची तर आयोजक श्री ज्ञानेश्वर चौधरी यांचे असुन कु. पूर्णिमा ठक्कर आणि कु. पलक ठक्कर हे गाण्यांवर कथ्थक नृत्य करणार आहेत.
रसिक श्रोत्यांना प्रवेश मोफत आहे. तसेच भाग्यवान श्रोत्यांसाठी लकी ड्रॉ द्वारे सोनी पैठणी गिफ्ट्स ही आहेत. तरी सर्वांनी वेळेवर पोहचून आपली सीट राखून ठेवावी अशी माहिती पत्रकार शैलेंद्र साळी यांनी दिली.
Comments
Post a Comment