मनपा हद्दीतील सर्व्हे नं. 866/1/1 विनय नगर येथील खाजगी मिळकतीवरील अनधिकृत विना परवाना बांधकामे जमिनदोस्त

इंदिरानगर : नाशिक मनपाकडून आज दिनांक 07/02/2023 रोजी दुपारी 1.00 वाजेपासून या मोहीमेला सुरुवात झाली. मा. जिल्हा न्यायालय, नाशिक येथे सर्व अनधिकृत बांधकाम धारकांनी मनपा विरुध्द़ दावे दाखल केले होते. ते सर्व दावे मा. जिल्हा न्यायालय, नाशिक यांनी फेटाळून लावले आहे. त्याआधी नगरनियोजन विभागामार्फेत प्रथम व अंतीम नोटीस संबधीतांना निष्कासन खर्चासह देण्यात आलेल्या होत्या. सदरची मोहीम राबवितांना त्यामध्ये एकुण 14 ते 15 मिळकतीपैकी 9 मिळकती निष्कासीत करणेत आलेल्या आहे. मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनानुसार उपआयुक्त़ अतिक्रमण करुणा डहाळे, मनपाचे सहाही विभागीय अधिकारी अतिक्रमण पथकासह तसेच कार्यकारी अभियंता, नगरनियोजन विभाग, संजय अग्रवाल व त्याचे अधिपत्याखालील सर्व अभियंते यावेळी उपस्थित होते. 
सदर मिळकती निष्कासीत करतांना कायदा व सुव्य़वस्थेच्या दृष्टीकोनातून पोलिस आयुक्त़ यांनी सदरची बांधकामे निष्कासनासाठी पुरविण्यात आलेल्या पोलिस बंदोबस्त़ांमध्ये 1 डी.सी.पी, 2 ए.सी.पी, 6 पोलिस निरिक्षक तसेच महिला व पुरुष 150 पोलिस बंदोबस्त़ तसेच मनपासाठी देण्यात आलेला दैनंदीन पोलिस बंदोबस्त़ यांचा समावेश होता. तसेच पाच जे.सी.बी, दोन पोकलॅन यांचा वापर करुन सदरची मोहीम यशस्वी करण्यात आलेली आहे. नाशिक मनपा कार्यक्षेत्रातील सर्व नागरीकांना या मोहीमेच्या माध्यमातून जाहीर आवाहन करणेत येते की, ज्या मिळकती अनधिकृत व विना परवाना असतील त्यांनी स्वत़: हून काढून घ्याव्यात अन्य़था मनपा कडून कारवाई करण्यात येईल असे आवाहन मनपा आयुक्त़ तथा प्रशासक यांच्याकडून करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन