ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे येथील ध्रुव नगर मध्ये महाशिवरात्री निमित्त भव्य बारा ज्योतिर्लिंग अध्यात्मिक मेळाव्याचे आयोजन
गंगापूर रोड -(प्रतिनिधी समाधान शिरसाठ) महाशिवरात्री या शब्दात रात्री या शब्दाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे भगवंत निराकार शिव परमार्थ्याचे या सृष्टीवर अज्ञान अंधकार व कलियुगी रुपी रात्री अवतरण होते याचेच प्रतिक म्हणजे महाशिवरात्रि होय निराकार शिव परमात्मा हे याच पापाचारी अज्ञानमय अंधकार रुपी कलियुगाचा विनाश करण्यासाठी या सृष्टी वर अवतरित होतात, याच स्मृती प्रित्यर्थ महाशिवरात्री साजरा केली जाते आजच्या महाशिवरात्रीनिमित्त सर्व भक्तांना आग्रहाचे निमंत्रण आहे की निराकार शिव परमात्म्याचा सत्य परिचय प्राप्त करून खरी महाशिवरात्री साजरी करा असे असे प्रतिपादन राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी जी यांनी केले, ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे येथील ध्रुव नगर मध्ये महाशिवरात्री निमित्त भव्य बारा ज्योतिर्लिंग अध्यात्मिक मेळाव्याचे आयोजन दिनांक 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलेले आहे या अध्यात्मिक मेळ्याच्या उद्घाटन प्रसंगी दीदीची अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे सकल भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी आध्यात्मिक जीवन उन्नत बनवण्यासाठी जीवनात सुख शांती आणण्यासाठी राज योग मेडीटेशन हा साप्ताहिक कोर्स निशुल्क उपलब्ध असल्याचे दीदिनी याप्रसंगी नमूद केले, व कोणत्याही ब्रह्माकुमारी सेवा केंद्रात जाऊन कोर्स करण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून उपस्थित माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील यांनी संस्थेच्या कार्याविषयी गौरव उद्गार काढले, मी एक राजकारणी व पुढारी असून आपली सुद्धा कशी आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे व अध्यात्मद्वारे आपले शरीर स्वास्थ्य व मन स्वास्थ्य कसे राखले जाते याचे स्पष्टीकरण दिनकर पाटील यांनी याप्रसंगी केले.
अध्यात्मिक सेवा करताना आम्हाला मोठ्यांचा आशीर्वाद प्राप्त झाला व अतिशय कमी दिवसात एवढा मोठा बारा ज्योतिर्लिंगाचा मेळावा आम्ही करू शकलो यात आमच्या सर्व ब्रह्मा कुमारी साधकांची मेहनत फळास आली असे विचार ब्रह्माकुमारी मनीषा दीदी यांनी आपल्या प्रास्ताविकात मांडले, येथील ध्रुव नगर मध्ये ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे एकाच छताखाली लावण्यात आलेल्या बाराही ज्योतिर्लिंग पूजनाचा संधी मिळाल्याबद्दल येथील भक्त गणांनी धन्यता मानली, कार्यक्रम यशस्वीतेसाठी गंगापूर रोड व सातपूरच्या ब्रह्माकुमारी संस्थेच्या साधकांनी यशस्वी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment