पंचक शाळेतून ‘जागरुक पालक, सुदृढ बालक’ अभियानाला प्रारंभ, वडाळा आरोग्य केंद्रात आरोग्य शिबीराला प्रतिसाद

नाशिक : (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) राज्य शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिकेतर्फे दि. 9 फेब्रुवारीला ‘जागरुक पालक, सुदृढ बालक’ अभियानाला प्रारंभ  करण्यात आला.  तसेच आरोग्य तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आले होते. दसक पंचक येथील मनपा शाळा क्रमांक 49 येथे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत ‘जागरुक पालक, सुदृढ बालक’ अभियानाला प्रारंभ झाला. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे आणि सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिता साळुंखे यांनी अभियानाची व्याप्ती आणि अंमलबजावणीची माहिती दिली. मा. आयुक्तांनी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले. मुलांचे आजार वेळीच लक्षात यावेत आणि त्यावर त्वरीत उपचार व्हावेत या उद्देशाने शासन अभियान राबवित आहे. शासनाच्या मोहिमेत तपासणी आणि शासनाकडूनच त्यावर उपचार होणार असल्याने त्याचा दुहेरी फायदा आहे. पालकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांना आरोग्य कार्डचे वाटप करण्यात आले. या अभियानात 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालक आणि किशोरवयीन मुला-मुलींची सर्वांगिण आरोग्य तपासणी होणार आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. विभावरी शिरोरकर, शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी सुनीता धनगर, विभागीय अधिकारी जयश्री बैरागी, दसक पंचक शाळा आणि आरोग्य केंद्राचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 
 वडाळ्यात आरोग्य शिबीर
धर्मवीर आनंद दिघे साहेब महाआरोग्य अभियान अंतर्गंत वडाळा येथील सावित्रीबाई फुले शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिका आणि आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत आरोग्य शिबीरात 406 नागरिकांची तपासणी करण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शिबीराला भेट देऊन रुग्णांशी, डॉक्टरांशी आणि केंद्रातील कर्मचा-यांशी संवाद साधला. स्त्री रोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, शल्य चिकीत्सक, कान-नाक-घसा तज्ज्ञ यांनी तपासणी केली. मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिता साळुंखे, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना कुटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपीका मोरे, डॉ. राजश्री पाटील, डॉ. आशणा शेख, डॉ. आयझा पिरझादा, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. सुशीलकुमार यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला