स्वर्गीय.लता दीदी यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त स्वर मंगेशाचे कार्यक्रम

नाशिक - कलांगण चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांचे वतीने भारतरत्न लता दीदी यांच्या प्रथम स्मृतिदिना निमित्त शुक्रवार दि.3 फेब्रुवारी रोजी सायं 6 वा. स्वर मंगेशाचे या सांगितीक विनामूल्य कार्यक्रमाचे आयोजन महाकवी कालिदास कला मंदिर येथे मंगेशकर पाचही भावंडांवर आधारित हा कार्यक्रम आहे. याची निर्मिती संकल्पना गायिका चैत्राली अभ्यंकर यांची आहे.यात त्यांच्या सोबत मुंबईचे गायक ऍड.अमित दाते आणि नाशिक मधील गायक संदीप थाटसिंगार गायन, साथ करणार आहे. वादयवृंद संयोजन रागेश्री धुमाळ यांचे असून अनिल धुमाळ,आदित्य कुलकर्णी,अभिजीत शर्मा,महेश कुलकर्णी, साथ संगत करनार आहे. संहिता लेखन प्रवीण जोशी यांचे असून अभिवाचन अक्षय वाटवे करतील. रसिकांनी उपस्थित राहून दीदींना आदरांजली वहावी असं निमंत्रण संयोजकांनी केलं आहें.या कार्यक्रमच्या विनामूल्य प्रवेशिका कालीदास सभागृहात उपलब्ध आहे.अधिक माहितीसाठी
 8669025606 येथे संपर्क साधवा व उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन