सकल मराठा परिवाराचे वतीने भव्य रक्तदान शिबीर संपन्न
नाशिक :- सकल मराठा परिवार नाशिक टीम ही नेहमी समाज कार्य करत असते सद्याच्या परिस्थितीत रक्ताचा तुटवडा जाणवत असून, अशा वेळी रक्तदात्यानी पुढं यावे अशी हाक राज्य संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य यांनी दिली त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत सकल मराठा परिवार ,नाशिक टीम ने या मानवतेच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद देत नाशिक परिवारा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, जिल्हा सत्र न्यायालय बिटको काॅलेज शेजारी, नाशिक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटनप्रसंगी नितीन ठाकरे मराठा विद्या प्रसारक संस्था सरचिटणीस,नितीन गावंडे उपजिल्हाधिकारी सारथी , उद्योजक दादा गांगुर्डे, मनोज घोडे पाटील उपायुक महानगर पालिका, नितीन डांगे पाटील, समाधान हेगडे पाटील तसेच चेतन शेलार, हर्षल इंगळे संभाजी ब्रिगेडे, विशाल देसले उद्योजक कक्ष तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात १०२ रक्तदाते यांनी आपले रक्तदान केले. यात विजय ठाकरे यांनी ६८ व्या वेळी रक्तदान केले तर छाया v सुरेखा या या दोन बहिणींनी पहिल्यांदा सोबतच रक्तदान केले तर रविकिरण गायकवाड यांनी आपल्या पत्नी सोबत रक्तदान केले. अनेक रक्तदाते रक्तदानास येऊनही काही वैयक्तिक अडचणी मुळे रक्तदान करू शकले नाही. यावेळी मराठा परिवार तर्फे आयोजित वकृत्व स्पर्धा विजेते यांचा सत्कार करण्यात आला हे शिबीर यशस्वी होण्यास सकल मराठा परिवार टीमचे समन्वयक खंडू आहेर,सागर सहाणे,दत्ता काळे,गौरव जाधव,राहुल पाटील,शुभम आहेर, प्रवीण हुल्लाळे, अक्षय बरकले,अजय सलादे,डॉक्टर श्याम देशमुख,डॉक्टर नितीन देशमुख,किरण शिंदे, शरद दवंडे, अभिजित चव्हाण, छाया फलाने, सुरेखा जाधव,अपूर्वा पाटील,दिपाली हिरे, रूपेश महाजन, चेतन घुले व सर्व सदस्य यांनी मनस्वी प्रयत्न केले या कॅम्प साठी एन. डी. एम. व्ही. पी. एस. मेडीकल कॉलेज & हॉस्पिटल ब्लड बँक- नाशिक यांचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment