स्वच्छ सर्वेक्षण २०२३ संदर्भात मनपात आढावा बैठक संपन्न

नाशिक : (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) स्वच्छ सर्वेक्षण २०२३ च्या अनुषंगाने नाशिक पूर्व व नाशिक पश्चिम या विभागांची आढावा बैठक दिनांक १३ फेब्रुवारी २०२३ रोजी मनपाच्या पश्चिम विभागीय कार्यालयातील सभागृहात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, विभागीय अधिकारी पश्चिम नितीन नेर, विभागीय अधिकारी पूर्व राजाराम जाधव यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत सर्व विभागांचा आढावा घेण्यात येऊन प्रलंबित कामे तत्परतेने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 
यात प्रामुख्याने मुख्य रस्ते तसेच अंतर्गत रस्त्यावरील दुभाजकांची स्वच्छता ,दुभाजकांमध्ये रोपे लावणे ,वाहतूक बेटांची स्वच्छता व सुशोभिकरण ,मुख्य रस्त्यांची साफसफाई ,नागरिकांमार्फात वर्गीकरण केलेला कचरा घंटागाडीमार्फत संकलीत करणे ,कचरा वर्गीकरण करण्याबाबत नागरिकांमध्ये प्रबोधन करणे ,शौचालय दुरुस्ती ,उद्यानातल्या कारंज्यांची दुरूस्ती करणे तसेच टाकाऊ वस्तूंचा उपयोग करून आकर्षक वस्तू ,खेळणी आदी तयार करणे, कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांमध्ये ओल्या कचर्यापासून कम्पोस्ट खात निर्मिती करणे याबाबत प्रबोधन करून जनजागृती करणे ,तसेच नालेसफाई बाबतच्या सुचना देण्यात आल्या. स्वच्छ सर्वेक्षण २०२३ च्या अनुषंगाने सिटीझन फीडबॅक (नागरिकांच्या प्रतिक्रिया) देण्याबाबत नागरिकांना प्रोत्साहित करणे, अनधिकृत जाहिरात फलक काढणेबाबत यावेळी सांगण्यात आले.
सदर बैठकीसाठी कार्यकारी अभियंता नितीन पाटील, रवींद्र धारणकर, विभागीय स्वच्छता निरिक्षक संजय गोसावी ,सुनील शिरसाठ ,घनकचरा व्यवस्थापन विभागचे स्वच्छता निरीक्षक तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग ,पाणीपुरवठा विभाग ,सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी (मलनि:स्सारण) आदी विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन