सिटी लिंक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हरवलेली दोन मुलं आई-वडिलांच्या ताब्यात

नाशिक (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे हरवलेली दोन मुले आईवडिलांकडे सुखरूपरित्या परत, एकाच आठवड्यातील दुसर्‍या घटनेमुळे सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या कामाचे कौतुक.
दोन दिवसांपूर्वी नाशिक मधील मखमलाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयातील हरवलेला मुलगा सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे त्याच्या आईवडिलांकडे सुखरूपपणे परत करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच सोमवार दिनांक ०६ फेब्रुवारी २०२३ रोजी पुन्हा एकदा सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या सतर्कता व जागरूकतेमुळे दोन हरविलेली मुले आई वडिलांकडे सुपूर्द करण्यात आली. 
 सोमवार दिनांक ६ फेब्रुबारी २०२३ रोजी सिन्नर तालुक्यातील माळेगाव फाटा येथील रहिवासी असलेली दोन मुले घरून पळून गेली होती. ही दोन मुले सख्खे भाऊ असून हे दोघे रात्री ८ वाजेच्या सुमारास सिटीलिंक बसमध्ये बसलेली होती. परंतु बसमधील चालक व वाहक यांना या दोन्ही मुलांनाबाबत संशय आल्याने त्यांनी या दोन्ही मुलांना घेऊन निमाणी बसस्थानक येथील वाहतूक नियंत्रक प्रवीण कांबळे यांचेकडे सुपूर्द केले. ही दोन्ही मुले शालेय गणवेशात असल्याने त्यानुसार चौकशी करून शाळेशी संपर्क साधण्यात आला व त्यानंतर आई वडिलांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा मुलांचे आई वडील निमाणी बस स्थानक येथे दाखल झाले असता सदर दोनही मुले सुखरूप रित्या आईवडिलांकडे सुपूर्द करण्यात आली.
 या घटनेनंतर आई वडिलांनी आनंद व्यक्त करतांनाच सिटीलिंक कर्माच्यार्‍यांचे आभार व्यक्त केले. तसेच एकाच आठवड्यात हरवलेल्या तीन मुलांना सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या सतर्कता व जागरुकतेमुळे आईवडिलांकडे परत पाठविण्यात आल्याने सिटीलिंक कर्मचार्‍यांच्या कामाचे देखील कौतुक करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला