भुमि अभिलेख जिल्हा अधीक्षक पन्नास हजार रुपये लाच स्वीकारताना एसीबीने पकडला

(साप्ताहिक प्रसिद्धी प्रमुख - संपादक समाधान शिरसाठ, संपर्क - 9881773140)
नाशिक : नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई, महेश कुमार महादेव शिंदे, वय -50 वर्ष, नाशिक जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, अतिरिक्त कार्यभार उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक, वर्ग 1
राहणार - फ्लॅट नं 301, पंडित कॉलनी लेन नंबर 1, गंगापूर रोड नाशिक.तसेच अमोल भीमराव महाजन, वय 44 वर्ष, कनिष्ठ लिपिक, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख नाशिक, रा.- फ्लॅट नंबर 47, विधाते नगर, रविशंकर मार्ग, नाशिक पुणे महामार्ग नाशिक.यांनी एक लाख रुपये लाचेची मागणी करुन रुपये पन्नास हजार लाच दिनांक ३१/०१/२०२३ रोजी स्वीकारली,यातील लाचलुचपत विभागाला तक्रार करणार यांचे वडिलांचे नावे असलेल्या शेत जमिनी चा भूमि अभिलेख कार्यालयाने तयार केलेला हिसा नमुना १२ मध्ये लिखाण प्रमादाची चूक झालेली असून सदरची चूक दुरुस्तीचे आदेश देण्यासाठी महेश कुमार महादेव शिंदे अधिक्षक भुमी अभिलेख नाशिक, यांनी स्वतः करिता तक्रारदार यांच्याकडून एक लाख रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी 50 हजार रुपये स्वीकारले.कनिष्ठ लिपिक अमोल महाजन यांनी तक्रारदार यांना लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिले म्हणून दोघांच्याही विरुद्ध सरकार वाडा पोलीस स्टेशन, नाशिक शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गायत्री जाधव, पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक सह अधिकारी - संदीप घुगे, 
पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक.
सापळा पथक पोलीस नाईक प्रकाश महाजन, पोलीस नाईक प्रणय इंगळे, चालक पोलीस शिपाई परशुराम जाधव, यांच्या पथकाने, शर्मिष्ठा घारगे-वालावलकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक नारायण न्याहाळदे अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक.नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा कारवाई केली.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला