अनाधिकृत वृक्षतोड विरोधात कारवाई, आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल, साडेसात लाखांचा दंड वसुल

नाशिक : (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) शहरातील अनाधिकृत वृक्षतोडबाबत नाशिक महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडुन वेळोवेळी कारवाई केली जाते. नवीन वर्षात मनपाच्या पश्चिम उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाकडुन विभागातील वेगवेगळया आठ ठिकाणी अनाधिकृत वृक्षतोडी बाबत आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच ७,५५,००० रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे. त्र्यंबक नाका येथील ओम सर्व्हिसस्टेशन पंप, मयुर गॅस एजन्सी, सर्वांगी साडी सेंटर तसेच बांधकाम विभागाच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संबंधीत पोलीस स्टेशनद्वारे कायदेशीर कार्यवाही सुरु आहे. उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचे पथक वृक्षतोडीच्या घटनांकडे लक्ष ठेवीत आहे. ही मोहीम आता आणखी कडक केली जाणार आहे. 
शहरातील नागरीकांनी वृक्ष छाटणी आणि वृक्ष तोडण्या करीता मनपाच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडुन रितसर परवानगी घेऊनच पुढील कार्यवाही करणे आवश्यक आहे. अन्यथा महानगरपालिकेकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन मनपा उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचे उप आयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन