आदिवासी विकास परिषदेचे लकी जाधव यांना धमकीचा फोन
नाशिक : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष लकी जाधव यांना धमकी मिळाली व बोगसांपासून त्यांच्या जीविताला धोका असल्याने त्यांच्या विरोधात (अनोळखी व्यक्ति बोगस आदिवासी समाधान कोळी रा उस्मानाबाद यांनी रात्रीच्या सुमारास धमकी दिल्याने याच्यावर अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा
यामागणीसाठी नाशिक येथे मुंबईनाका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अहिरे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष लकी जाधव यांच्यासह अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवा कार्याध्यक्ष गणेशभाऊ गवळी, के ए ग्रुप अध्यक्ष संदीपभाऊ गवारी उपस्थित होते
Comments
Post a Comment