श्री संत बाळूमामांच्या मेंढ्या उडवून पळालेल्यास कठोर शासन, तसेच नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी, मेंढपाळ कृती समितीच्या वतीने करण्यात आली
सिन्नर : श्री संत श्री बाळु मामा यांच्या मेंढ्या चा अपघात होऊन अज्ञात वाहानाच्या धडकेने १५ मेंढ्या उडवल्याने भक्तांमध्ये संतप्त भावना निर्माण झाली आहे.सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे संत श्री बाळु मामा यांची पालखी गावाजवळ पोहचली, शहा पंचाळे चौफुली ह्या ठिकाणी हा अपघात झाला यात पंधरा मेंढ्या उडवुन अज्ञात गाडीचालक पसार झाला.
यावेळी संतप्त झालेल्या भक्त परिवाराने गावकऱ्यांनी घटनास्थळी त्याचप्रसंगी रात्रीच्या वेळी रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते.यावेळी उपस्थित पोलिस प्रशासन,राजकिय नेते यांनी आंदोलकांची समजूत काढली कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते, अजूनही योग्य ती कारवाई झाली नसल्याने मेंढपाळ कृती समितीचे अध्यक्ष व उत्तर महाराष्ट्र धनगर समाजाचे नेते अरुण दादा शिरोळे, दिपक सुडके, शहा ग्रा प सदस्य शरद मोरे, बाळासाहेब साबळे, ज्ञानेश्वर मोरे, यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच त्याअज्ञात वाहनधारकांचा शोध घेऊन कडक कारवाई करावी गुन्हा दाखल करून सीसीटिव्ही चेक करुन संबंधितांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी राज्य सरकारकडे, करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment