कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा,प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्राणांतिक उपोषण
कांद्याला दोनशे,तीनशे रुपये क्विंटल असा मातीमोल भाव मिळत असल्याने सरकारने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात,उत्पादन खर्च पंधराशेच्या वर जवळपास सत्तर टक्के वजा खर्चात कांदा विकला जात आहे.सरकारने शेतकरी बांधवांना किमान ५०० रुपये अनुदान द्यावे, किमान १२०० रुपये भाव, मिळावा,बाजारसमितील अवांतर नियमबाह्य खर्चावर आळा घालावा, समित्यांच्या बाजार भावात तीनशे,पाचशे फरक करू नये याकरिता उपजिल्हानिबंधका मार्फत समिती नेमून काम बघावे, कांदा वादा हे प्रकरण कायमचे मिटवून तसा कायदा करण्यात यावा.कांदा निलावा नंतर १ रुपये किमी पेक्षा जास्त वाहतूक खर्च आकारला जाऊ नये अशा प्रकारच्या मागण्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या राज्य वतीने करण्यात आल्या आहेत.यावेळी प्रहारचे गणेश निंबाळकर,प्रकाश चव्हाण,सह कार्यकर्ते,शेतकरी प्राणांतिक उपोषणाला उपस्थित होते.
Comments
Post a Comment