Posts

Showing posts from June, 2025

लेखापरीक्षक अधिकारी प्रमोद (आप्पासाहेब)रामदास पेंढारकर,यांचा सेवापुर्ती सोहळा उत्साहात संपन्न

Image
धुळे :- येथील सहायक लेखापरीक्षक अधिकारी प्रमोद (आप्पासाहेब)रामदास पेंढारकर,यांचा सेवापुर्ती सोहळा मोठ्या उत्साहात सहकारी, मित्रमंडळी, नातेवाईकांच्या उपस्थितीत संपन्न. पेंढारकर हे धुळे येथे शासकीय सेवेतील सहाय्यक लेखापरीक्षक अधिकारी म्हणून कार्यरत होते. प्रमोद रामदास पेंढारकर, यांच्या सेवापुर्ती सोहळ्याप्रसंगी सहकारी अधिकारी,कर्मचारी, नातेवाईक,मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी र. वा.निकम सहाय्यक संचालक लेखापरीक्षक अधिकारी धुळे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रोहन रघुनाथ कुवर उपजिल्हाधिकारी/प्रांताधिकारी धुळे.नारायण भलकार आर पी कुवर, सेवानिवृत्त नायब तहसीलदार, अरुण दादा शिरोळे उत्तर महाराष्ट प्रमुख यशवंत सेना, डॉ. अनिल धनगर,राज्य उपाध्यक्ष मानव अधिकार नंदुरबार राहुल भलकार,उप अभियंता.सुदाम आण्णा भलकार, संचालक सुतगिरणी.नारायण भलकार,गोविंद देवरे, माजी सरपंच.प्रा सनेर सर. सोनाली ताई पगारे,मा सदस्य पंचायत समिती. प्रा बी जे बागुल, मिनाताई पेंढारकर, आदि प्रमुख पाहुणे उपस्थित होते.एक सर्व सामान्य शेतकरी परिवारातला मुलगा अधिकारी होवुन सेवानिवृत्त होत...

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

Image
नाशिक ना.रोड :- रेल्वे स्टेशन नासिक रोड येथील टि.सी. यांचे सरकारी कामात अडथळ निर्माण करून त्यांना जखमी करून पसार झालेल्या आरोपीस रेल्वे पोलीस नाशिक रोड येथील पोलीसांना आले यश फिर्यादी नामे नंदकिशोर रमेश शिंदे वय 36 वर्श धंदा नौकरी ( रेल्वेत टि.सी. ) रा. ऋतुराज अपार्टमेन्ट रूम नं. 07 शनि मंदीर जेल रोड नाशिकरोड हे दि. 25.06.2025 रोजी सकाळी 05.25 वा.च्या सुमारास एक अनोळखी प्रवासी त्याचे वर्णन वय अं. 40 ते 45 वर्ष उंची 5 फुट 5 इंच रंगाने गहुवर्ण, अंगाने मजबुत, कपडे अंगात सफेद रंगाचा फुल बाहीचा शर्ट, नेसणीस काळया रंगाची फुल पॅन्ट अश्या वर्णनाच्या इसमाने फिर्यादी हे प्लॅटफाॅर्म नं. 1 वरील आ.एम.एस. ऑफिस जवळ डयुटी करत असतांना नमुद वर्णनाच्या इसमा हा पळु लागल्याने त्यास फिर्यादी यांनी तिकीट विचारले असता त्यास राग आल्याने फिर्यादी यांचे सोबत शाब्दिक वाद विवाद करून त्यांचे डयुटीत अडथळा निर्माण करून शर्टच्या वरिल खिश्यातुन काहीतरी वस्तु काढुन फिर्यादी यांच्या डाव्या गालावर मारून दुखापत करून पळुन गेला त्याबाबत फिर्यादी यांना दुखापत झाल्याने व सरकारी कामात अडथळा निर्माण झाल्याने फिर्यादी...

महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाने जागतिक स्तरावर ओळख निर्माण करावी - सरन्यायाधीश भूषण गवई

Image
नागपूर येथे प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन ; ग्रंथालयाचे भूमिपूजन नागपूर,दि.29 : येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून यापुढील काळात उत्तम शैक्षणिक कामगिरी बजावण्यासह विधी क्षेत्रासाठी प्रतिभावंत विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी विद्यापीठाची आहे. सर्वांचा सहभाग व समर्पणातून निर्माण झालेल्या या विद्यापीठाने आपल्या गुणवत्तेच्या माध्यमातून जागतिक स्तरावर ओळख निर्माण करावी, असा आशावाद देशाचे सरन्यायाधीश आणि विद्यापीठाचे कुलपती भूषण गवई यांनी आज येथे व्यक्त केला. वारंगा (नागपूर) येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आणि ग्रंथालयाच्या इमारतीचे भूमिपूजन आज सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, न्या. प्रसन्न वराळे, न्या. अतुल चांदूरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तथा विद्यापीठाचे प्रकुलगुरू न्या. आलोक आराधे, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय प...

स्वामी विवेकानंद विद्यालयात गणराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे मोफत वह्यांचे वाटप

Image
नाशिक पंचवटी :- पंचवटीतील स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद विद्यालयात गणराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रसंगी शालेय गीतमंचाने सुमधुर संस्कृत गीत गायन केले.त्यानंतर गणराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा परिचय संस्थेच्या कार्याचा परिचय सेक्रेटरी हिरालाल परदेशी यांनी करून दिला. मोफत वह्या वाटप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर गुरुमितसिंग बग्गा उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना "आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याचे आवाहन केले". कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे मार्गदर्शक आयमा संस्थेचे खजिनदार गोविंद झा यांनी भूषविले त्यांनी मनोगत व्यक्त करतांना सर्व विद्यार्थ्यांना "मराठी अथवा हिंदी माध्यमातून शिकत असल्याचा न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने कोणतेही काम करावे असे सुचविले.कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी माजी उपमहापौर गुरमीतसिंग बग्गा, आयमा संस्थेचे खजिनदार ग...

माजी महानगर प्रमुखासह शेकडो उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या सैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश

Image
ठाणे :- उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे नाशिक जिल्ह्यातील माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह नाशिक महानगरपालिकेतील सात नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी आज #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासह नाशिक मनपातील माजी नगरसेवक संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे, विष्णुपंत बेंडकुळे, प्रवीण पाळदे, पल्लवी पाटील, निलेश ठाकरे, उषाताई शेळके यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच उबाठा शिवसेनेचे उप महानगरप्रमुख निवृत्ती इंगोले, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ फडोळ, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष मोहनीश दोंदे, उबाठा युवासेना तालुका अध्यक्ष सुनील मते, त्र्यंबकेश्वरचे सभापती खंडू भोये, सरपंच रमेश भोये, दिलीप चौधरी, इगतपुरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दशरथ धांडे, राजेश मोरे, नितीन भागवत, दयाराम आहेर, संकेत सातभाई, सचिन कर्डीले यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.विलास शिंदे यांच्या घरातील लग्नसोहळ्याला मी गेलो तेव्हापासून मला त्यांचा पक्षप्रवे...

येत्या पाच वर्षात ‘जीएसडीपी’ ३५ लाख कोटींवर नेण्याचे ध्येय - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
'महा स्ट्राइड' उपक्रमाचा शुभारंभ; 'मित्र' राज्याच्या विकासाला दिशा देणारी महत्त्वपूर्ण संस्था म्हणून नावारूपास येईल नागपूर, दि. २८:- शासन ही एक संस्था आहे. संस्था म्हणून याची क्षमता आणि संस्थात्मक बांधणी योग्य रीतीने झाली तर आपण मोठे परिवर्तन साध्य करू यात शंका नाही. या दृष्टीने अधिक विचार करून आपण 100 दिवस प्रशासकीय सुधारणा उपक्रम, त्यापाठोपाठ 150 दिवस उपक्रम हाती घेतले. आज ज्याचा प्रतिनिधिक शुभारंभ केला तो ‘महा स्ट्राइड’ हा उपक्रम राज्याच्या विकासाला दिशा देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मिहान येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या सभागृहात या प्रकल्पाचा प्रातिनिधिक शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, मित्राचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, उपाध्यक्ष राणा जगजीत सिंग पाटील, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशी, अपर मुख्य सचिव राजेश कुमार मीना, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, जागतिक बँकेचे...

मनसेच्या वतीने दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थींचा सन्मान

Image
नाशिक इंदिरानगर :- येणारा काळ कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे.आत्ता पासून हे तंत्रज्ञान समजून घ्या.आजवर आपल्याला असे सांगितले गेले की जे आवडते त्यात करिअर करा, परंतु कित्येक क्षेत्रे कालबाह्य होत आहेत. त्यामुळे जगाला काय हवे आहे त्यात करिअर करा असे प्रतिपादन मुक्त विद्यापीठाचे माजी उप कुलसचिव प्रफुल्ल चिकेरूर, यांनी केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्य नाशिक विभागाच्या वतीने यश संपादन केलेल्या दहावी बारावी परीक्षेत यश संपन्न केलेल्या गुणवंत विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांचा सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. यावेळी प्रफुल्ल चिकेरूर, बोलताना सांगितले.की पुढील दशक असंख्य नवीन क्षेत्रातील लक्षावधी नवीन संधी घेऊन येणार आहे. त्याचा विचार करून करिअर निवडा. कित्येक पारंपरिक शिक्षण शाखा आता बंद होतील चुकीचे मार्ग स्वीकारून तुमचे तारुण्य वाया न घालवता कमीत कमी वयात आपण संशोधन, उद्योग यामध्ये यशस्वी कसे होऊ याच्या प्रयत्नाला आज पासून लागा असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, जिल्...

एकल महिलांची सुरक्षा, रोजगार आणि आर्थिक स्वावलंबनासाठी धोरणात्मक उपाययोजना आवश्यक – उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे

Image
मुंबई दि. २८: राज्यातील एकल महिलांसाठी सुरक्षा, रोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाबाबत धोरणात्मक उपाययोजना अंमलात आणणे आवश्यक आहे. यासाठी महसूल, अन्न व नागरी पुरवठा, महिला व बालविकास विभाग, आरोग्य, रोजगार हमी योजना आणि ग्रामविकास विभागामार्फत एकल महिलांचा डेटा संकलित करून, त्यांना प्राधान्यक्रम देणाऱ्या योजना राबवाव्यात असे निर्देश उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी दिले. एकल महिलांच्या समस्या आणि उपाययोजना संदर्भात आज विधानभवन येथे आयोजित बैठकीत उपसभापती डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. बैठकीस सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा, महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त नैना गुंडे, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आर. विमला, उपायुक्त राहुल मोरे, आदिवासी विकास विभागाचे सह सचिव मच्छिंद्र शेळके, रोजगार हमी योजनेचे सह सचिव अतुल कोदे, साऊ एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी, सदस्य मिलिंद साळवे उपस्थित होते. उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, अविवाहित अशा एकल महिलांना सामाजिक आणि आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांच्या ...

आदिवासी समाजाच्या विकासासाठी प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान - मंत्री डॉ. अशोक वुईके

Image
अभियानात पुणे जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्याकरीता काम करा पुणे, दि. २८: आदिवासी जमातीच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरीता ‘प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ राबविण्यात येत आहे. शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा नागरिकांना लाभ देऊन जिल्ह्यात अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन पुणे जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्याकरीता प्रशासनाचे काम करावे, याकरीता स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून हे अभियान यशस्वीपणे पूर्ण करावे, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियान आणि प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार उमा खापरे, दिलीप वळसे पाटील, सुनील शेळके, बापूसाहेब पठारे, शंकर मांडेकर, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लिना बनसोड, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त गोपीचंद...

सरन्यायाधीश पदापर्यंतच्या प्रवासात नागपूरचे योगदान महत्वपूर्ण- सरन्यायाधीश भूषण गवई

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा जिल्हा न्यायालयात सत्कार नागपूर, दि 27 :- नागपूर शहरासोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. दरवर्षी धम्मप्रवर्तन दिनी आई- वडीलांसोबत दिक्षाभूमीवर येत असे. पुढे वकिली व न्यायदान क्षेत्रात नागपूर जिल्हा व सत्र न्यायालय, जिल्हा वकील संघटना आणि उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ येथे काम करतांना बऱ्याच गोष्टी आत्मसात करता आल्या, अशा भावना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज येथे व्यक्त केल्या. जिल्हा व सत्र न्यायालय येथे नागपूर जिल्हा वकील संघटनेच्या वतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई आणि पत्नी डॉ. तेजस्विनी गवई, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, न्यायमूर्ती अतुल चांदूरकर, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे, ज्येष्ठ न्यायमूर्ती अनिल किलोर, न्यायमूर्ती अभय मंत्री आणि नागपूरचे प्रधान जिल्हा व सत्र न...