नागरिकांनी ओला व सुका कचरा विलगीकरण करावे - मनपा आयुक्त मनिषा खत्री


नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त आणि प्रशासक मनिषा खत्री यांनी आज घंटागाड्यांच्या माध्यमातून कचऱ्याचे संकलन आणि व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्याबाबत सूचना केल्या. त्यांनी नागरिकांना कचरा देताना ओला व सुका कचरा वेगवेगळा टाकण्याचे आवाहन केले आहे, ज्यामुळे कचऱ्याचे योग्य विलगीकरण होईल आणि त्याचा प्रभावी व्यवस्थापन करता येणे शक्य येईल.
आयुक्त खत्री यांनी नाशिक पूर्व आणि नवीन नाशिक विभागातील घंटागाड्यांची पाहणी केली. या पाहणीच्या वेळी त्यांनी नागरिकांना घंटागाडी वरील कर्मचार्‍यांना ओला आणि सुका कचरा विलगीकरणाचे महत्त्व सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त (सेवा) स्मिता झगडे, उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन संचालक अजित निकत आणि विभागीय स्वच्छता निरीक्षक यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

या पहाणी मोहिमेत आयुक्त खत्री यांनी इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक, शिवराम वझरे नगर आणि गोविंद नगर जॉगिंग ट्रॅकची दैनंदिन स्वच्छता ठेवावी आशा सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या. आयुक्त खत्री यांनी नवीन नाशिक भागातील पवण नगर, उत्तम नगर, आणि त्रिमूर्ती चौक या रस्त्यांची देखील पाहणी करून दैनंदिन झाडलोट व स्वच्छते बाबत सकाळी प्रत्यक्ष पहाणी करून कामांची स्थिती तपासून आढावा घेतला.

आयुक्त खत्री यांनी सांगितले की, "आपणा सर्वांनी मिळून नाशिक शहरात स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. योग्य कचरा विलगीकरणामुळे महानगरपालिकेच्या स्वच्छतेच्या कार्यात अधिक सक्षमतेने कार्य करणे शक्य होईल,नागरिकांचे आरोग्य अबाधित दाखण्यासाठी शहर स्वच्छ असणे महत्त्वाचे आहे" 

नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद देऊन कचरा टाकताना ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची आवश्यकता अधिक महत्त्वाची आहे. यामुळे नाशिकच्या सर्व परिसरात स्वच्छता राखण्यात मदत होईल आणि वातावरणातील प्रदूषण कमी करण्यासही मदत मिळेल.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला