मुंबईत सीमाशुल्क विभागाच्या वतीने कोट्यवधी रुपयांचे कोकेन जप्त

मुंबई :- मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 16.49 कोटी रुपये किमतीचे कोकेन केले जप्त; एका प्रवाशाला केली अटक

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 1.649 किलोग्रॅम अमली पदार्थ जप्त केले असून याची अंदाजे किंमत 16.49 कोटी रुपये आहे. 27 जानेवारी 2025 च्या रात्री विशिष्ट माहिती आणि संशयाच्या आधारे अधिकाऱ्यांनी पॅरिसमार्गे साओ पावलो (ब्राझील) येथून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाला अडवले. या प्रकरणी पाच दिवसांच्या कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी प्रवाशाकडून पांढऱ्या रंगाचा चूर्णयुक्त पदार्थ असलेल्या 170 कॅप्सूल जप्त केल्या. त्यात कोकेन असल्याचा संशय आहे. संशयित प्रवाशाला अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ (एनडीपीएस) कायदा, 1985 अंतर्गत अटक करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी