नवीन नाशिकमध्ये सेंट्रलपार्क- मध्यवर्ती उद्यानाच्या विकासाला वेग – मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी केली पाहणी



नाशिक महानगरपालिकेच्या वतीने पेलिंकन पार्कच्या १७ एकर जागेत मध्यवर्ती उद्यान (सेंट्रल पार्क) उभारण्याचे महत्त्वाकांक्षी काम सुरू असून, या प्रकल्पाची पाहणी मनपा आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी केली.
या प्रकल्पात ॲम्यूझमेंट राईड, विविध ठिकाणी उद्यान विकसन, लहान मुलांसाठी स्वतंत्र खेळाची जागा, खुला रंगमंच, जॉगिंग ट्रॅक, टॉय ट्रेन आणि ऑर्किड रोप लागवड करून ऑर्कीडीयम उभारण्याचा समावेश आहे. याशिवाय, आधुनिक खेळण्यांच्या सुविधा फूड कोर्ट येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर कामे जलदगतीने व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने आयुक्त खत्री यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. विशेषतः तीन ठिकाणी मियावाकी फॉरेस्ट विकसित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, उद्यान अधीक्षक विवेक भदाणे,कार्यकारी अभियंता जितेंद्र पाटोळे, विभागीय अधिकारी जयश्री बैरागी उ उपअभियंता हेमंत पठे, आणि अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मनपा आयुक्तांनी सार्वजनिक बांधकाम, विद्युत आणि उद्यान विभागाला संपूर्ण सेंट्रल पार्क प्रकल्प निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्णरित्या पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
या उपक्रमामुळे नाशिक शहरातील नागरिकांना एक अद्ययावत आणि आधुनिक सुविधा असलेले सेंट्रल पार्क लवकरच उपलब्ध होणार आहे.


Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला