गंगापूर रोडवरील तीन केंद्रांवर बैठकव्यवस्था जाहीर,अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन
बारावीसाठी केटीएचएम महाविद्यालयाचे 3,354 परीक्षार्थी


नाशिक : एचएससी बोर्डाची बारावीची परीक्षा येत्या मंगळवार (दि.११)पासून सुरु होत आहे. या परीक्षेसाठी गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविद्यालय या केंद्र क्र.105-ब वर सर्व शाखांचे मिळून तब्बल ३,३५४ परीक्षार्थी प्रविष्ठ असून, या सर्व विद्यार्थ्यांची बैठकव्यवस्था केटीएचएम महाविद्यालयासह विविध उपकेंद्रांवर करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य केंद्र संचालक एस. एन. कासव यांनी दिली.
सर्व शाखांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांची सर्व विषयांची तसेच, हिंदी, संस्कृत, फ्रेंच, भूगोल, सहकार, गणित (कॉमर्स) समाजशास्त्र, एचएसव्हिसी या सर्व विषयांची परीक्षा परीक्षा केटीएचएम या मुख्य केंद्रावर होणार आहे, याची नोंद विद्यार्थी व पालकांनी घ्यावी. अधिक माहितीकरिता केंद्र संचालक एस. एन. कासव (९४२१५६५८२२), प्रा.बी. एम. सोनवणे (९२८४०४८०९९), प्रा. पी. ए.ठोंबरे (९७३०१५४९४९), डी. व्ही. हयाळीज ८७६७८२९२०८, यु. बी. हाडोळे (९८८१२४९०८३), अनिल भंडारे (७५८८५५८९५९) आर.एन. गांगोडे (८८८८११९९८४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
*अशी असेल बैठकव्यवस्था*
बैठक क्रमांक : S002255 to S003032 (विज्ञान), S146961 to S148224 + S400002 (वाणिज्य), S164167 to S164265 (एचएसव्हिसी) या परीक्षार्थींची सर्व विषयांची परीक्षा केटीएचएम महाविद्यालयात होणार आहे. बैठक क्रमांक : S001747 to S002254 (विज्ञान) या परीक्षार्थींची इंग्रजी, मराठी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जिवशास्त्र या विषयांची परीक्षा मराठा हायस्कूल या उपकेंद्रावर होईल. बैठक क्रमांक : S091483 to S092223 +S400001 (कला) या परीक्षार्थींची इंग्रजी, मराठी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास या विषयांची परीक्षा गंगापूर रोडवरील सीएमसीएस महाविद्यालयात होणार आहे.
Comments
Post a Comment