मीदेखील ‘केटीएचएम’चा माजी विद्यार्थी - खा.भास्कर भगरे
केटीएचएम महाविद्यालयात वार्षिक गुणगौरव सोहळा
फोटो नाशिक : केटीएचएम महाविद्यालयात आयोजित वार्षिक गुणगौरव सोहळ्याप्रसंगी खासदार भास्कर भगरे यांचा सत्कार करताना मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. समवेत सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती डी. बी. मोगल, संचालक लक्ष्मण लांडगे, प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, उपप्राचार्य डॉ. एस. के. शिंदे आदी.
नाशिक : मविप्रचे केटीएचएम महाविद्यालय हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आधार आहे. केटीएचएममध्ये विद्यार्थ्यांना जे हवंय ते देण्याचे काम एकाच छताखाली संस्था करते. ३० वर्षांपूर्वी मी याच महाविद्यालयात शिकलो. ज्या क्षेत्राची निवड कराल ते क्षेत्र नक्कीच आपल्याला चांगल्या उंचीपर्यंत नेता आले पाहिजे. त्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवा. अशी तयारी ठेवली तर नक्कीच जीवनामध्ये यशस्वी होऊ शकाल, असा विश्वास दिंडोरी लोकसभेचे खासदार खासदार भास्कर भगरे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
केटीएचएम महाविद्यालयात शनिवारी (दि.०८) पार पडलेल्या वार्षिक गुणगौरव सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे होते. यावेळी व्यासपीठावर सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती डी. बी. मोगल, शहर संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, उपप्राचार्य डॉ. एस. के. शिंदे तसेच कनिष्ठ महाविद्यालय स्कूल कमिटी सदस्य उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक वार्षिक आढावा सादर केला. उपप्राचार्य डॉ. एस. के. शिंदे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी सभापती बाळासाहेब क्षीरसागर म्हणाले की, केटीएचएम हे संस्थेमध्ये अव्वल महाविद्यालय असून, या महाविद्यालयाचा नावलौकिक टिकविण्याचे काम निश्चितपणे शिक्षक करत आहेत. येथे विद्यार्थीसंख्या प्रचंड वाढत आहेत या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण याठिकाणी मिळाले पाहिजे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, हा एकच संस्थेचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.
यावेळी सर्व शैक्षणिक व क्रीडा स्पर्धेत गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या राज्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उपप्राचार्य डॉ. एस. के. शिंदे यांचा संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रा. दादा कदम यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. किरण रेडगाकर यांनी आभार मानले.
अंध विद्यार्थ्यांना अवघ्या दहा रुपयांमध्ये प्रवेश : ॲड. नितीन ठाकरे
यावेळी सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे म्हणाले की, भास्कर भगरे यांच्याप्रमाणेच मीदेखील याच संस्थेचा माजी विद्यार्थी आहे. ही संस्था केवळ शिक्षणावरच भर देत नाही तर मुलांच्या सर्वांगीण विकासावरही लक्ष देते. अंध विद्यार्थ्यांना अवघ्या दहा रुपयांमध्ये प्रवेश संस्था देते. असे १५० विद्यार्थी सध्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. त्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय सुसज्ज कॉम्प्युटर लॅब तयार केली आहे. केटीएचएम महाविद्यालय म्हणजे एक मोठे संकुल आहे. येथे इमारती कमी पडत आहेत. पुढील काही दिवसांत येथे एक चांगला ऑडिटोरियम बांधण्याचे नियोजित आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने वार्षिक गुणगौरव कार्यक्रम सगळ्यात आनंदाचा क्षण असतो. विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये अभ्यासाप्रमाणेच सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा यांनाही महत्त्व असल्याचे ते म्हणाले.
फोटो नाशिक : केटीएचएम महाविद्यालयात आयोजित वार्षिक गुणगौरव सोहळ्याप्रसंगी विद्यार्थ्यांचा गौरव करताना मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, खासदार भास्कर भगरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती डी. बी. मोगल, संचालक लक्ष्मण लांडगे, प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, उपप्राचार्य डॉ. एस. के. शिंदे आदी
Comments
Post a Comment