नाशिक येथे सकल मराठा परिवार तर्फे आयोजित रक्तदान शिबिर संपन्न

नाशिक :- सकल मराठा परिवार नाशिक टीम ही नेहमी समाज  कार्य करत असते सद्याच्या परिस्थितीत रक्ताचा तुटवडा जाणवत असून, अशा वेळी रक्तदात्यानी पुढं यावे अशी हाक राज्य संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य यांनी दिली त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत सकल मराठा परिवार नाशिक टीम ने या मानवतेच्या हाकेला  सकारात्मक प्रतिसाद देत,माणुसकीचा झरा या भावनेतून नाशिक सकल मराठा परिवारा तर्फे  छत्रपति शिवाजी महाराज चौक, श्री साई हॉस्पिटल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात १३२ रक्तदाते यांनी यावेळी रक्तदान केले.

या शिबिरासाठी शिवजन्मोत्सव समिती तसेच डॉ.मिलिंद पवार  यांचे योगदान लाभले. तर मराठा विद्या प्रसारक यांच्या रक्तपेढीचे सहकार्य मिळाले. याशिबिराची सुरवात लग्न मंडपातून येत नवदांम्पत्य प्रविण त्र्यंबक सोनवणे,तृप्ती विठ्ठल सरपत यांनी सोबतच नव जीवनातील पाहिले रक्तदान केले. रवींद्र पदाडे माजी सैनिक यांनी वय (७२) विरेंद्र सिंग ठाकूर , गिरीश पाटील, माजी सैनिक यांनी रक्तदान केले.या शिबिरात अनेक बांधवां सोबत महिला भगिनींनी सहभाग घेतला.अनेक रक्तदाते रक्तदानास येऊनही काही वैयक्तिक अडचणी मुळे रक्तदान करू शकले नाही.हे शिबीर यशस्वी होण्यासाठी   सकल  मराठा परिवार ग्रुप चे सर्व सदस्य यांनी मनस्वी प्रयत्न केले. तसेच शिवजन्मोत्सव समिती व डॉ. मिलिंद पवार यांचे महत्वाच सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन