केटीएचएम महाविद्यालय ट्रॅडिशनल डे साजरा
फोटो केटीएचएम महाविद्यालयात ट्रॅडिशनल डे निमित्त विविध राज्यातील पारंपारिक पोशाख परिधान केलेले विद्यार्थी




नाशिक :- मविप्रच्या केटीएचएम महाविद्यालयात ट्रॅडिशनल डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाश्चिमात्य पोशाखांबरोबरच विविध राज्यांतील कला संस्कृतीचे दर्शन घडविणारे पोशाखांना विद्यार्थ्यांनी पसंती दिली. पंजाबी, दक्षिणी, बंगाली, राजस्थानी, गुजराथी आदि पोशाख मुलामुलींनी परिधान केले होते.
भारतातील विविध राज्यांतील पोशाख विद्यार्थ्यांनी परिधान केले होते. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. महाविद्यालयाच्या मैदानावर सर्व विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य डाॅ एस.एस.काळे उपप्राचार्य डाॅ. एस.के.शिंदे विभाग प्रमुख किरण रेडगावकर दिलीप गावले , रामनाथ पवार, एन. बी.कुयटे यांनी संयोजन केले.
Comments
Post a Comment