पुणे येथील क्रिकेट प्रशिक्षण शिबीरात १२ वर्षिय मयंक वाबळे सहभागी



पुणे :- पुणे येथे राजस्थान रॉयल्स क्रिकेट अकादमीतर्फे विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १० ते १२ फेब्रुवारी २०२५ यादरम्यान श्रीलंका क्रिकेट संघातील माजी वेगवान गोलंदाज आणि सध्याचे राजस्थान रॉयल्स संघाचे वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक चामिंडा वास यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील निवडक खेळांडूसाठी आयोजित करण्यात आले होते. सदरहू प्रशिक्षण शिबिरासाठी वडाळागाव शिवार, नाशिक येथील आर.व्ही. स्पोर्ट्स क्लबतर्फे मयंक महेंद्र वाबळे (वय १२ वर्ष) यास अष्टपैलू खेळाडू म्हणून संधी देण्यात आली.मयंक वाबळे याच्या अष्टपैलू कामगिरीने चामिंडा वास प्रभावित झाले आणि त्याचे विशेष कौतुक करून भविष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी