गजानन युवा प्रतिष्ठान वनवैभव कॉलनी यांच्या वतीने साई भंडारा
इंदिरानगर - येथील गजानन युवा प्रतिष्ठान वनवैभव कॉलनी यांच्या वतीने साई भंडारा निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 63 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. या रक्तदात्यांचा साईनाथ ब्लड सेंटर यांच्या व प्रतिष्ठानच्या वतीने सुमित काठे व ब्लड सेंटरच्या जनसंपर्क अधिकारी अमृता संसारे यांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. दरम्यान दुग्गल यांचा साई भजनाच्या कार्यक्रमात साईबाबाची विविध भजने सादर करण्यात आली. उपस्थितांचे स्वागत अक्षय बिन्नर यांनी केले.आभार ललित अहिराव यांनी मानले यावेळी उपस्थितीत साई भक्तांना भंडाऱ्याचे वाटप करण्यात आले. रक्तदान शिबिर यशस्वी तेथे साठी डॉ.अजय वाघचौरे डॉ. मयुरी यांनी व सेंटरच्या कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment