मविप्र कृषी महाविद्यालयाच्या तिसऱ्या तुकडीचा प्रस्ताव कृषिमंत्र्यांना सादर
फोटो नाशिक : राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना मविप्र कृषी महाविद्यालयाच्या तिसऱ्या तुकडीचा प्रस्ताव सादर करताना मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. समवेत मविप्रचे शिक्षणाधिकारी डॉ. अजित मोरे व कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे
नाशिक :- महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी नुकताच मविप्र कृषी महाविद्यालयाच्या तिसऱ्या तुकडीचा प्रस्ताव सादर केला. सन २००३ पासून सुरु असलेले मविप्रचे कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय १२० विद्यार्थ्यांच्या संख्येने सध्या सुरु आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विदयापीठाकडून कृषी महाविद्यालयास ‘अ’ दर्जा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर महाविद्यालयास १०० एकरहून अधिक प्रक्षेत्र, प्रशासकीय इमारत, मुलामुलींचे वसतिगृह, अशा सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. त्याच अनुषंगाने मविप्र कृषी महाविद्यालयास तिसऱ्या तुकडीची मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांना सादर केला. याप्रसंगी मविप्रचे शिक्षणाधिकारी डॉ. अजित मोरे व कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे उपस्थित होते.
Comments
Post a Comment