इंदिरानगर येथील अभिराज खोडे पुणे येथील क्रिकेट शिबीरात सहभागी
पुणे :-श्रीलंकन क्रिकेट संघाचे माजी वेगवान गोलंदाज चमिंडा वास यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथे घेण्यात आलेल्या डावखुऱ्या जलद गती गोलंदाजांच्या शिबिरात इंदिरानगर येथील अभिराज संदीप खोडे,याला संधी मिळाली.राजस्थान रॉयल्स या आयपीएल संघातर्फे हे शिबिर पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातील सोळा वर्षाखालील डावखुऱ्या २५ खेळाडूंना आमंत्रित करण्यात आले.अभिराज ला आर व्ही स्पोअर्ट क्लब कडून शिबीरात सहभागी होण्याची संधी देण्यात आली.
Comments
Post a Comment