मविप्रचे सटाणा महाविद्यालय ठरले सर्वोत्कृष्ट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सन्मानित


फोटो पुणे  कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय मेधणे व प्राध्यापकवृंद


सावित्रीबाई फुले-पुणे विद्यापीठातर्फे गौरव

नाशिक :- मराठा विद्या प्रसारक समाज संचलित सटाणा येथील कर्मवीर आबासाहेब तथा नारायण मन्साराम सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे ‘ग्रामीण भागातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे येथे सोमवारी (दि.१०) आयोजित शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. 
याप्रसंगी पद्मश्री डॉ. शंकर अभ्यंकर, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, संचालक डॉ. प्रसाद सोनवणे, ॲड. आर. के. बच्छाव, शालनताई सोनवणे, शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय मेधणे, प्राध्यापकवृंद आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. विजय मेधणे यांच्या नेतृत्वाखाली नावीन्यपूर्ण उपक्रम, अनोखे संशोधन, उत्कृष्ट निकालाची परंपरा राखल्यामुळेच महाविद्यालयाची पुणे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील तीन जिल्ह्यांमधून निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार ग्रामीण भागातील अव्यावसायिक महाविद्यालय या श्रेणीमध्ये देण्यात आला आहे. स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र आणि दीड लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे व पदाधिकारी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापकवृंद यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवृंद यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या पुरस्कार वितरणप्रसंगी उपप्राचार्य डॉ. नरेंद्र निकम, समन्वयक डॉ. राजेंद्र वसईत, डॉ. साहेबराव कांबळे, डॉ. एस. बी. आंधळे, प्रा. निलेश पाटील, प्रा. अमित निकम, डॉ. आर. बी. अहिरे, प्रा. तुषार खैरनार, प्रा. स्वप्निल शेंडगे, प्रा. सागर माने, प्रा. आदेश राऊत, प्रा. संदीप कुरकुटे, दीपक वाघ व बहुसंख्येने शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार घेण्यासाठी पुणे येथे उपस्थित होते.

मविप्र संस्थेची सर्वच शाळा-महाविद्यालये नेहमीच विविध उपक्रम राबवत असतात. त्यामुळेच पुरस्कार मिळविण्यातही ते आघाडीवर असतात. मविप्र संस्थेने सुरु केलेले बागलाण तालुक्यातील हे पहिले महाविद्यालय आहे. या महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे मिळालेल्या पुरस्कारामुळे संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. संस्थेच्या इतिहासात ही नोंद घेतली जाणार आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे पाठबळ, शिक्षकांचे कठोर परिश्रम व त्यांनी प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न आणि विद्यार्थी-पालकांचे सहकार्य यामुळे अशा प्रकारचे यश गाठणे शक्य आहे. मी सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने सटाणा महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापकवृंद, सेवक, विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन करतो.
- ॲड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र, नाशिक 


विद्यार्थीहित लक्षात घेऊन नेहमीच विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या सटाणा महाविद्यालयाला गेल्या वर्षीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या नॅक कमिटीतर्फे ‘ए’ मानांकन मिळालेले आहे. मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा या अभियानांतर्गत तालुकास्तरावर पहिले आणि जिल्हास्तरावर तिसऱ्या क्रमांकाचे तीन लाखांचे पारितोषिक पटकावले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने शासकीय शिष्यवृत्तीव्यतिरिक्त हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीमार्फत तब्बल २१ लाख २० हजार ४०० रुपयांची शिष्यवृत्ती ५५० विद्यार्थ्यांना मिळवून दिली आहे. येथील सायली अहिरे या खेळाडूने ‘खेलो इंडिया’मध्ये बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात कांस्यपदक मिळविलेले आहे. या शैक्षणिक वर्षात येथे ३,१०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
- डॉ. विजय मेधणे, प्राचार्य, सटाणा महाविद्यालय, बागलाण.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला