मेंढपाळ बांधवाचा रेणुका माता माथ्यावर घाटात अपघात
चांदवड :- दि.०३फेब्रु मेंढपाळ बांधवांचे नुकसान पाच ते सहा मेंढ्या चा मृत्यू, अपघातात तीस वर्षीय युवक गंभीर जखमी
मेंढ्यांचे मालक पोपट मांगु टकले (वय 50/51वर्ष )गाव - डिगा वे तालुका साक्री जि.धुळे) हे मेंढ्यांचा कळप घेऊन दुपारी 2ते 2.5दरम्यान आपल्या गावाकडे जात असताना रेणुका माता माथा राष्ट्रीय महामार्ग चांदवड घाट येथून जात असताना मागून येणारा महिंद्रा कंपनीचा नवीन टेम्पो मालेगावच्या दिशेने जात होता. या टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गावर रस्त्यावरील मेंढ्यांना चिरडले आहे.याकळपामध्ये काही मेंढ्या या गर्भवती असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असुन घटनास्थळावरून पोलिसांनी चालकास ताब्यात घेतले आहे. यावेळी आपल्या घरातील सदस्याप्रमाणे त्यांचे पालन पोषण करणाऱ्या मेंढ्यांचा दुर्दैवी मृत्यूने मेंढपाळांनी मोठा आक्रोश व्यक्त केला.
हा अपघात एवढा भीषण होता की, घटनास्थळी मेंढ्याच्या रक्त मांसाचा अक्षरशः सडा पडलेला होता. संपूर्ण रस्त्यात मेंढ्यांच्या मृत्तावस्थेत पडल्या होत्या.तसेच देविदास पोपट टकले वय वर्ष 29 ते 30 याला गंभीर डोक्याला व छातीला दुखापत झाली.याघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस वाघ यांनी मेंढपाळ बांधवांना सुविधा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले.त्यांच्यावर उपचार सुरू आहे. चालकाच्याने दारुच्या नशेच्या निष्काळजीपणे गाडी चालवली असल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे.याप्रकरणी मेंढपाळाने आरोपी ट्रक चालकावर कठोर कारवाई करत नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
Comments
Post a Comment