मराठा हायस्कूलच्या १६ खेळाडूंना ३ लाख ८ हजार रुपये शिष्यवृत्ती
नाशिक मनपा अर्थसहाय्य योजनेंतर्गत शिष्यवृत्तीचे वितरण
नाशिक :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मराठा हायस्कूलमधील १६ खेळाडूंना नाशिक मनपा अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ३ लाख ८ हजार रुपये क्रीडा शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर मनपा समाजकल्याण उपआयुक्त नितीन नेर, मनपा क्रीडा विभाग प्रमुख आनंद भालेराव, मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात, उपमुख्याध्यापक रंगनाथ उगले,पर्यवेक्षक राजेंद्र शेळके,शंकर कोतवाल,रामनाथ रायते यांच्या प्रमुख उपस्थितीत शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले आहे.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. उपआयुक्त नितीन नेर यांनी विद्यार्थ्यांना मनपा क्षेत्रातील क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती योजनांविषयी माहिती दिली. तसेच राज्यस्तरावरील क्रीडा शिष्यवृत्ती अर्थसहाय्य योजनेअंतर्गत मराठा हायस्कूल नाशिक हँन्डबॉल या क्रीडा स्पर्धेमध्ये १४ वर्षाआतील मुलांच्या संघाने राज्यस्तरीय शालेय राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. या सर्व हँन्डबॉलच्या १५ खेळाडूंना नाशिक मनपा अंतर्गत शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली. प्रत्येक खेळाडूला २० हजार रूपये शिष्यवृत्ती मिळाली. तसेच जलतरण या क्रीडा स्पर्धेमध्ये रुद्र घनश्याम बच्छाव या खेळाडूला ८ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळाली. एकूण शिष्यवृत्ती ३,०८,०००/-रु मिळाली. वरील सर्व खेळाडूंचा उपआयुक्त नितीन नेर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सर्व विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक जयंत आहेर, मंगला शिंदे, सुहास खर्डे, राजाराम पोटे, हरीभाऊ डेर्ले, अनिल उगले, सुयश कुभार्डे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. क्रीडाशिक्षक अनिल उगले यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक शंकर कोतवाल यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
शिष्यवृत्तीप्राप्त खेळाडू
वरुण रतन कांगणे, रेहान जाकीर शेख, रोहन निवृत्ती महाले, ज्ञानेश प्रभाकर ठाकरे, अजिंक्य शिवाजी कहार, हितेश अमोल हांडगे, सार्थक नवनाथ गवळी, मयंक अजय बोके, सोहम विजय खैरनार, गोविंद अशोक चव्हाणके, स्वराज बाळासाहेब लांडगे, साहिल प्रवीण सानप, प्रतीक जनार्दन बामणे, पृथ्वीराज योगेश खैरनार, आदित्य प्रभाकर भोईर
Comments
Post a Comment