ॲड. बाबूराव ठाकरे व्यक्तित्त्व आणि कर्तृत्व’ या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशन

दादासाहेबांचे चरित्र आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी : निवृत्त न्यायमूर्ती पुखराज बोरा

फोटो नाशिक : ‘ॲड. बाबूराव ठाकरे व्यक्तित्त्व आणि कर्तृत्व’ या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, लेखक डॉ. बाळासाहेब गुंजाळ, वैशाली प्रकाशनचे प्रकाशक विलासराव पोतदार


नाशिक : चांदवड तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यातून शहरात आलेला माणूस खडतर प्रवास करून शिक्षण व विधी क्षेत्रात कर्तृत्व गाजवतो. अडलेल्या- नडलेल्या प्रत्येकाला मदत करतो. मविप्रसारख्या शिक्षण संस्थेचा पाया रचतो. ॲड. बाबूराव ठाकरे यांचा जीवनप्रवास खरोखर थक्क करणारा आहे. आज अभावानेच अशी कर्तृत्ववान माणसे बघायला मिळतात. त्यांचा चरित्रग्रंथ आजच्या पिढीला खरोखर प्रेरणा देणारा ठरेल, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पुखराज बोरा यांनी केले.
कर्मवीर ॲड. बाबूराव गणपतराव ठाकरे यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘ॲड. बाबूराव ठाकरे व्यक्तित्त्व आणि कर्तृत्व’ या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
गंगापूर रोड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात कर्मवीर ॲड. बाबूराव ठाकरे यांच्या स्मृतीदिनी (दि.२३) सायंकाळी हा समारंभ पार पडला. 
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष तथा मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिकचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, लेखक डॉ. बाळासाहेब गुंजाळ, वैशाली प्रकाशनचे प्रकाशक विलासराव पोतदार उपस्थित होते. सिम्बॉयसिस विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. बी. मुजुमदार यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे उपस्थिती दर्शवित कर्मवीर ॲड. बाबूराव ठाकरे यांच्या कार्याचा गौरव केला. 
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व ॲड. बाबूराव ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते सर्व मान्यवरांना शाल, पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.
कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी स्मृतिरुपी ग्रंथामुळे।बाबुराव ठाकरे यांना समजून घेण्याची संधी तरुण पिढीला उपलब्ध झाली असल्याचे सांगत हा चरित्र ग्रंथ प्रत्येकाने आवर्जून वाचावा, असे आवाहन केले. 
ॲड. नितीन ठाकरे यांनी प्रास्ताविकात वडील कर्मवीर ॲड. बाबूराव ठाकरे यांच्या अनेक जुन्या आठवणी सांगून त्यांच्या कार्याला उजाळा दिला. पणजोबा विठ्ठलराव गाढवे यांच्यापासून आजवर ठाकरे कुटुंबाने मविप्र संस्थेसाठी दिलेले योगदान आणि केलेले कार्य कथन केले. असे पितृछत्र लाभले ते मी भाग्य समजतो, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून समाजासाठी काहीतरी देण्याचा छोटासा प्रयत्न करतोय. दादासाहेबांनी ज्या ठिकाणी वकिलांसाठी चेंबर्सची इमारत उभारली, आज त्याच परिसरात माझ्या कार्यकाळात ३०० कोटी रुपये खर्चून भव्य इमारत उभी राहतेय, हे माझे भाग्य समजतो, असेही ते म्हणाले. लेखक डॉ. बाळासाहेब गुंजाळ यांनी ग्रंथ लिहिण्यामागची प्रेरणा आणि लिखाणासाठी ज्यांची मदत झाली, त्या जामदार अण्णा आणि दिनकर आहेर यांचे महत्वपूर्ण योगदान लाभल्याचा उल्लेख केला. प्रकाशक विलासराव पोतदार यांनीही मनोगत व्यक्त करून हा चरित्र ग्रंथ खूपच आधी प्रकाशित व्हायला हवा होता, असे सांगत 'देर आये दुरुस्त आये' असे नमूद केले. सौरभ टोचे यांनी सूत्रसंचालन केले.
शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके यांनी आभार मानले. शेवटी आनंद अत्रे यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, धुळ्याच्या खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, मविप्रचे उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी यांच्यासह सर्व संचालक, आजी माजी पदाधिकारी, संचालक, सभासद, शिक्षणाधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, विधी आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


ॲड. ठाकरेंनी स्किल विद्यापीठ सुरू करावं : कुलगुरू डॉ. मुजुमदार
लेखकाने सखोल अभ्यास करून हा चरित्रग्रंथ लिहिला आहे. दादासाहेब पहिल्यापासूनच 
विधी आणि शिक्षण क्षेत्रात रमायचे.त्यांनी या दोन्ही क्षेत्रात खूप मोठं काम केलं. ज्ञानाची गंगोत्री खेड्यापाड्यापर्यंत नेली. त्यांचे कार्य इतके अफाट आहे की, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी त्यांची तुलना होऊ शकते. आता त्यांचा वारसा पुढे चालविणाऱ्या नितीन ठाकरे यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन विद्यार्थ्यांसाठी स्किल विद्यापीठ सुरू करावं, असा सल्ला सिम्बॉयसिस विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. बी. मुजुमदार यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे दिला.

दादासाहेबांमुळे नवीन समाजनिर्मिती : न्यायमूर्ती कर्णिक
शिक्षण आणि विधी क्षेत्रात काम करताना दादासाहेबांनी नवीन समाज निर्माण केला. वकिलांची नवी फळी निर्माण केली. स्वतःसाठी नाही पण दुसऱ्याला देण्याचं काम त्यांनी केले. या पुस्तकामध्ये असे बरेच पैलू उलगडण्यात आले आहेत. दादासाहेबांच्या आचार आणि विचारांची उद्दिष्टपूर्ती झाल्याचे पुस्तक वाचल्यावर जाणवते, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी व्यक्त केले.



Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला