श्री गणेश मुर्ती बनवितांना मार्गदर्शक तत्वे पाळावी
पर्यावरणास घातक असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरीस (पीओपी) पासून बनविलेल्या मूर्तीवर न्यायालयाच्या आदेशानुसार बंदी आहे. मूर्ती तयार करण्याचे काम झालेले नसल्याने पीओपीला पर्याय म्हणून पर्यावरण संवर्धनासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करणारे मूर्तिकार, कारागीर, उत्पादक किंवा व्यावसायिकांकडून मूर्ती खरेदी करण्यासाठी नागरिकांनी प्राधान्य द्यावे. तसेच पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक महापालिकेकडून करण्यात येत आहे. माती, कागद, तसेच इतर पर्यायांचा वापर करून पर्यावरण संरक्षणासाठी हातभार लावावा, असे आवाहन नाशिक महापालिकेकडून देण्यात येत आहेत.
मार्गदर्शक सूचना खालील प्रमाणे :-
केवळ जैवविघटनशील पर्यावरणास अनुकूल अशा शाडू माती, चिकण माती वापरून बनवलेल्या कच्च्या मालापासून मूर्ती तयार करणे.
अजैविक कच्चा माल, तसेच प्लास्टर ऑफ पॅरीस, प्लॅस्टिक आणि वर्माकोल (पॉलिस्टीरिन) चा वापर न करणे,
मुर्तीचे दागने बनविण्यासाठी फक्त वाळलेल्या फुलांपासून बनवलेले साहित्य, पेंढा इत्यादीचा वापर करावा
आणि मूर्ती आकर्षक बनविण्यासाठी झाडांची नैसर्गिक उत्पादने चमकदार सामग्री म्हणून वापर करावा. मूर्ती रंगविण्यासाठी पर्यावरणास अनुकूल वॉटर कलर्स, जैवविघटनशील आणि बिनविषारी नैसर्गिक
रंगाचा वापर करावा, विषारी आणि नॉन बायोडिग्रेडेबल (अविघटनशील) रासायनिक रंग, ऑइल पेंट्स, इ कृत्रिम रंगावर आधारित पेंटस वापरू नयेत.
नैसर्गिक साहित्य आणि रंग वापरून बनवलेले व काढता येण्याजोगे आणि धुण्यायोग्य सजावटीचे कपडे वापरावेत,
फक्त वनस्पतीपासून तयार होणारे रंग (फुले, साल, पुंकेसर, पाने, मुळे, बिया, फळे) खनिज किंवा रंगीत खडक अशा नैसर्गिकरीत्या रंगांचा वापर करावा.
Comments
Post a Comment