नियमित सूर्यनमस्काराने मानवाचे आरोग्य निरोगी - ॲड. नितीन ठाकरे


फोटो नाशिक : जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रमामध्ये सहभागी झालेले मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. समवेत मान्यवर व विद्यार्थी

केटीएचएम महाविद्यालयात सामूहिक सूर्यनमस्कार
नाशिक :- सूर्यनमस्कार ही योगसाधना जागतिक स्तरावर अधिक लोकप्रिय आहे. सूर्यनमस्कारामुळे मानवाचे आरोग्य निरोगी बनते. त्याचबरोबर मानसिक, शारीरिक आणि आत्मिक आरोग्यही सुदृढ होते. शरीराला बहुगुणी फायदे देणारी सूर्यनमस्कार ही योगसाधना नियमित करावी, असे आवाहन मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले.
महाराष्ट्र शासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक, मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक, केटीएचएम महाविद्यालय व मराठा हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने रथसप्तमी आणि जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित सामूहिक सूर्यनमस्काराच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संपत काळे, मुख्याध्यापक पुरुषोत्तम थोरात, क्रीडा अधिकारी भाऊसाहेब जाधव, महेश पाटील, उपप्राचार्य डॉ. पी. व्हि. कोटमे, कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. मिनाक्षी गवळी, क्रीडा संचालक प्रा. हेमत काळे उपस्थित होते. यावेळी ॲड. नितीन ठाकरे यांनी सूर्यनमस्काराचे फायदे व महत्त्व सांगून स्वतः सामूहिक सूर्यनमस्कारात सहभाग घेतला. प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संपत काळे यांनी सूर्यनमस्काराचे शास्त्रीय भाषेत महत्व सांगून सूर्यनमस्कारामुळे शारीरिक सामर्थ्य प्राप्त होते, असे प्रतिपादन केले. जिमखाना विभागप्रमुख व कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. मिनाक्षी गवळी यांनी सूर्यनमस्काराची माहिती सांगत लयबद्ध पद्धतीने सूर्यनमस्कार करून घेतले व सूर्यनमस्कारामुळे आरोग्यावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांची माहिती सांगितली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक राजेंद्र शेळके, उपमुख्याध्यापक रंगनाथ उगले, प्रा. कैलास लवांड, प्रा.बाळासाहेब शिंदे, प्रा. अविनाश कदम, उद्धव डेरले, क्रीडाशिक्षक हरिभाऊ डेरले, जे. के. आहेर, अनिल उगले, मंगल शिंदे, पूनम गोसावी, रितिका झाल्टे, ओम मोरे, दौलत बेंडकुळे, लोखंडे आदींनी परिश्रम घेतले. याप्रसंगी मराठा हायस्कूल आणि महाविद्यालयातील खेळाडू, विद्यार्थी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक यांनी मंत्राचा उच्चार करून सामूहिक सूर्यनमस्कार घातले. 

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन