नाशिक शहरातील अनाधिकृत धंद्यांवर कारवाईची आ.देवयानी फरांदे सह भाजप शिष्ठमंडळाची मागणी
नाशिक शहरामधील कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांवर कठोर कारवाई करणेबाबत आ.देवयानी फरांदे व भाजपा शिष्ठमंडळाचे पोलीस आयुक्तांना निवेदन




नाशिक :- नाशिक शहरातील गंगापुर रोड, कॉलेज रोड, वडाळा परिसर, इंदिरानगर परिसर, व्दारका परिसरात रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या क्लब, हॉटेल, बियरबार, पानस्टॉल स्पा अशाप्रकारच्या अनधिकृत व्यवसायांवर कारवाई करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, यांना निवेदन देत करण्यात आली.रात्री उशीरापर्यंत अनधिकृत व्यवसाय सुरू असतात. शहरातील युवक, युवती विविध प्रकारच्या नशेच्या आधिन होत चालले आहेत. याचे प्रत्यंतर दोन दिवसापूर्वी गंगापुर रोड येथे घडलेल्या घटनेतून समोर आलेले आहे.
असे बेधुंद युवक, युवती पोलीस प्रशासनालाही देखील गैरवर्तन, मुजोरी दाखवतात. अशावर कडक कारवाई करण्यात यावी. बरेच पार्क, गोदा पार्क, गार्डन, कॉलेज व आजू बाजूच्या परिसरात, कॉलेज व स्कुल परिसरातील हॉटेल हे नशा गिरीचे अड्डे झाले आहेत. शहरातील अशा सर्व ठिकाणी पोलीस प्रशासनाने (पेट्रोलिंग) पोलीस गस्त वाढवून तात्काळ कारवाई करावी. नाशिक शहरातील विविध ठिकाणी बिल्डिंगच्या साईड मार्जिन मध्ये अनधिकृत बांधकाम करून त्यामध्ये हॉटेल झाली आहेत त्यामध्ये इतर गैरउद्योग चालू झाले हे सर्व त्वरीत बंद करावे. शहरातील सीसीटिव्ही तात्काळ कार्यान्वीत करावे तसेच ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह करण्याऱ्यावर तात्काळ गुन्हे दाखल करणेबाबतही मागणी आमदार देवयानी फरांदे यांच्यासह उपस्थित भाजपा शिष्टमंडळाने केली.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव, आ.देवयानी फरांदे, भाजपा प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, गिरीष पालवे, सरचिटणीस सुनील केदार, काशिनाथ शिलेदार, ॲड.श्याम बडोदे, मंडल अध्यक्ष वसंत उशीर, भास्कर घोडेकर, अजिंक्य फरांदे, सागर शेलार, शिवा जाधव, बापु शिंदे, अमोल शेळके, यशवंत निकुळे, सुरेश आण्णा पाटील, सुनील खोडे, अनिल ताजनपुरे, शिवाजी गांगुर्डे, रवींद्र गांगुर्डे, सचिन मोरे, संगीता जाधव, अक्षय गांगुर्डे, विनोद येवले, सुमन विश्वकर्मा, सोनाली ताबक, मनिषा जट, उषा ताठे, भारती मोरे, मृणाल नानिवडीकर, वर्षा येवले, नयना शर्मा, पुष्पा बेग, रुपाली मर्चंडे, मनिषा घमंडी, विजया देसले, सतबीर दहिया, सतिष कोठारी, सुनिल लोणारी, सागर धर्माधिकारी, आदित्य सोनवणे, मंदार ढोमसे, सुनिल मोहिते, गोपी राजपुत आदींसह मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment