एचएएल कडून भारतीय वायू दलाच्या Su-30 MKI विमानांसाठी सुमारे 26,000 कोटी रुपये खर्चून 240 एरो-इंजिन खरेदी करण्यास सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने दिली मंजुरी

नवी दिल्‍ली, 2 सप्‍टेंबर :- सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने, 2 सप्टेंबर 2024 रोजी, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून (HAL) खरेदी (भारतीय) श्रेणी अंतर्गत भारतीय हवाई दलाच्या (IAF) Su-30 MKI विमानांसाठी, सर्व कर आणि शुल्कांसहित 26,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाची  240 एरो-इंजिन (AL-31FP) खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या एरो-इंजिनचा पुरवठा एक वर्षानंतर सुरू होईल आणि आठ वर्षांच्या कालावधीत पूर्ण होईल.

एरो-इंजिनच्या काही प्रमुख घटकांच्या स्वदेशीकरणामुळे इंजिनांमध्ये 54% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्री असेल.  हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या कोरापुट विभागात या  एरो-इंजिनचे उत्पादन केले जाईल.

Su-30 MKI हे  भारतीय वायू दलाच्या सर्वात शक्तिशाली आणि सामरिकदृष्ट्या-महत्त्वाच्या ताफ्यातील एक विमान आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे या एरो-इंजिनांचा पुरवठा भारतीय वायू दलाला आपल्या मोहीमा विनाअडथळा  सुरू ठेवण्यासाठी तसेच देशाच्या संरक्षण सज्जतेला बळकट करण्यासाठी त्यांच्या ताफ्याच्या निर्वाहाची आवश्यकता पूर्ण करेल.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी